Eknath Khadse  Saam TV
महाराष्ट्र

Eknath Khadse News: एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी; राजकीय वर्तुळात खळबळ

Threat to Eknath Khadse : एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याच्या धमकीचे फोन आले आहेत. चार वेगवेगळ्या नंबरवरून त्यांना ही धमकी आल्याचं समजलंय. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकच खळबळ उडाली आहे.

Ruchika Jadhav

राजकीय वर्तृळातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याच्या धमकीचे फोन आले आहेत. चार वेगवेगळ्या नंबरवरून त्यांना ही धमकी आल्याचं समजलंय.

साम टीव्हीशी संवाद साधताना एकनाथ खडसे म्हणाले की, "पर्वापासून काल रात्रीपर्यंत मला धमकीचे फोन आले आहेत. आम्ही तुम्हाला मारू, तुमचा जीव घेऊ अशी धमकी फोनवरून देण्यात आलीये. सदर नंबर ट्रेस केल्यानंतर एक अमेरिका आणि एक उत्तर प्रदेशातील असल्याचं दिसत आहे."

" याबाबत पोलीस स्टेशला मी तक्रार दाखल केली आहे. पोलीस आता या प्रकरणी चौकशी करतायत. तपासात काय समोर येतं ते पाहावं लागेल, असंही एकनाथ खडसेंनी यावेळी सांगितलं.

दाऊदच्या पत्नीशी फोनवर संभाषण

अमेरिका आणि लखनऊ येथून हे फोन आलेत. या आधी देखील मला असे धमकीचे फोन आले होते. गेल्या काही दिवसांपूर्वी दाऊदच्या पत्नीशी फोनवर माझं संभाषण झाल्याचा आरोप माझ्यावर करण्यात आला होता. मात्र त्यावेळी देखील तपासात एका व्यक्तीने खोडसाळपणा करत एका सॉफ्टवेअरवरून हा फोन कॉल झाल्याचं दाखवलं होतं, हे देखील एकनाथ खडसेंनी यावेळी स्पष्ट केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात भरधाव कारनं धावाऱ्याला उडवलं, अपघातात इंजिनियरचा मृत्यू

Gold Rate Today: गणेशोत्सवापूर्वी सोन्याच्या दरात मोठी घसरण, वाचा सुवर्णनगरीतील 18k- 22k आणि 24k चे दर

कपडे धुण्याची योग्य वेळ कोणती? काय आहेत वास्तू नियम?

भाजप खासदाराचा राजीनामा; मोदी सरकारकडून मोठी जबाबदारी

Konkan Village : दापोलीजवळचं 'हे' सुंदर गाव एकदा पाहाच, येथील सौंदर्य जणू स्वर्गच

SCROLL FOR NEXT