Konkan Village : दापोलीजवळचं 'हे' सुंदर गाव एकदा पाहाच, येथील सौंदर्य जणू स्वर्गच

Shreya Maskar

कोकणची सफर

कोकणात गणपतीला अनेक लोक गावी गेले आहेत. गणपतीची मनोभावे पूजा करून झाल्यावर कोकण फिरा. कोकणातील सुंदर गाव पाहायला विसरू नका.

Journey to Konkan | google

रत्नागिरी

महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात केळशी हे गाव वसलेले आहे. येथील केळशी बीच जगात भारी आहे.

Ratnagiri | google

केळशी बीच

केळशी बीच येथे पांढरी शुभ्र वाळू आणि स्वच्छ निळ्या पाण्याने नटलेला शांत व स्वच्छ समुद्रकिनारा आहे. येथे पावसाळ्यात आणि हिवाळ्यात थंड वातावरण अनुभवता येते.

Kelsi Beach | google

केळशी गाव

केळशी गाव अद्वितीय भौगोलिक वैशिष्ट्यासाठी म्हणजेच समुद्रकिनाऱ्यालगत तयार झालेल्या प्रचंड वाळूच्या टेकडीसाठी ओळखले जाते. केळशी हे कोकणची शान आहे.

Kelshi village | google

आजूबाजूचा परिसर

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील केळशी गावात श्री आशापूरक सिद्धिविनायक महागणपती, केळशी आणि ऐतिहासिक केळशीतील महालक्ष्मी मंदिर ही दोन्ही प्रसिद्ध मंदिरे आहेत.

Surroundings | google

हिरवीगार निसर्ग संपदा

महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील वैशिष्ट्यपूर्ण अशा सुपारी, नारळ आणि आंब्याच्या दाट बागांनी हे गाव वेढलेले आहे. येथे तुम्हाला पावसाळ्यात निसर्गाचा अद्भुत नजारा पाहायला मिळेल.

Green natural wealth | google

केळशी बीच जलक्रीडा

केळशी बीचला गेल्यावर बनाना राइडचा आनंद घेता येतो. तुम्ही येथे भन्नाट फोटोशूट करू शकता.

Kelsi Beach Water Sports | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : १२ हजार फूट उंचीवर तलाव अन् काठावर अनोखं गाव, डोळ्यांचं पारणं फेडणारे सौंदर्य

India | AI PHOTO
येथे क्लिक करा...