India : १२ हजार फूट उंचीवर तलाव अन् काठावर अनोखं गाव, डोळ्यांचं पारणं फेडणारे सौंदर्य

Shreya Maskar

सुंदर तलाव

हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यात ३,६६२ मीटर (१२,०१४ फूट) उंचीवर वसलेले 'नाको सरोवर' हे एक पवित्र सरोवर आहे.

Beautiful lake | google

नाको तलाव

हिवाळ्यात हे सरोवर पूर्णपणे गोठून त्याचे नैसर्गिक 'आइस-स्केटिंग रिंक'मध्ये रूपांतर होते. हा नजारा पाहायला येथे नक्की जा.

Nako Lake | google

हिरवागार निसर्ग

नाको सरोवर हे विलो आणि पॉपलर वृक्षांनी वेढलेले आहे. येथून निसर्गाचा अद्भूत नजारा पाहायला मिळतो.

Green nature | google

हंगामानुसार बदल

उन्हाळ्याच्या महिन्यांत येथे बोटिंगची सुविधा उपलब्ध असते, तर हिवाळ्यात पाणी गोठल्यामुळे स्थानिक लोकांसाठी त्याचे नैसर्गिक 'आइस-स्केटिंग रिंक'मध्ये रूपांतर होते.

Seasonal changes | google

हिमाचलय

नाको गाव आणि नाको सरोवर ही ठिकाणे अद्वितीय आहेत कारण ती हिमाचलयाच्या कुशीत वसलेली आहेत. येथे एका बाजूला रुक्ष आणि थंड वाळवंट तर दुसऱ्या बाजूला हिरवागार परिसर यांचा सुरेख संगम पाहायला मिळतो.

Himachalya | google

सरोवराची रचना

हे सरोवर नाको गावाच्या सीमेजवळ अशा प्रकारे वसलेले आहे की, गावातील घरे त्याच्या काठावर अर्धवट गाडल्यासारखी दिसतात.

The structure of the lake | google

कधी भेट द्यावी?

नाको तलावाला भेट देण्यासाठी मे ते ऑक्टोबर हा काळ सर्वात उत्तम मानला जातो. या महिन्यांत येथील हवामान आल्हाददायक असते आणि रस्तेही प्रवासासाठी खुले असतात.

When to visit? | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : पावसाळ्यात फिरण्याची हौस असेल तर बेलापूरजवळची 'ही' ५ ठिकाणं मिस करू नका!

Belapur Tourism | AI PHOTO
येथे क्लिक करा...