Eknath Khadse
Eknath Khadse saam Tv
महाराष्ट्र

Eknath Khadse: पंधरा दिवसांमध्ये पक्षात मला प्रवेश द्यावा, एकनाथ खडसेंची भाजपला विनंती

साम टिव्ही ब्युरो

>> अमर घटारे

Eknath Khadse News:

''येणाऱ्या पंधरा दिवसांमध्ये माझा प्रवेश करावा, अशी विनंती मी भाजप पक्षाकडे केली आहे. त्या दृष्टिकोनातून बावनकुळे यांनी सांगितल्याप्रमाणे प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मला बोलावणं आल्यावर त्या ठिकाणी मी जाईल, दिल्लीला माझा पक्षप्रवेश व्हावा, अशी माझी इच्छा आहे'', असं शरद पवार गटाचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे म्हणाले आहेत. आज पत्रकारांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.

खडसे म्हणाले आहेत की, ''उद्या होणाऱ्या मोदींच्या सभेला मी जाणार नाही. मी अद्याप पक्षप्रवेश केलेला नाही. माझा पक्षप्रवेश झाल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी नेत्यांच्या सभा असेल त्या त्या ठिकाणी मी जाईल.''  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ते म्हणाले, 'प्रवेशाबाबद मी रोहिणी खडसे यांच्यासोबत कुठलीही चर्चा केली नाही. रोहिणी खडसे स्वतंत्र आहेत. त्यांची फॅमिली स्वतंत्र आहे. त्यांना आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे. त्या विचार मांडण्यासाठी सक्षम आहे.''  (Latest Marathi News)

दरम्यान, एकनाथ खडसे यांचा आतापर्यंत राजकीय जीवनातील प्रवास कसा राहिला हे, जाणून घेऊ

एकनाथ खडसेंच्या राजकीय जीवनातील महत्त्वाचे टप्पे

1988 - कोथळी गावचे सरपंच

1989 - मुक्ताईनगरचे आमदार

1997 - भारतीय जनता पक्ष-शिवसेना सरकारमध्ये पाटबंधारे मंत्री

2009 - विरोधी पक्षनेतेपदी निवड

2014 - भाजप सरकारमध्ये महासूल मंत्री, कृषी मंत्री, अल्पसंख्याक मंत्री, उत्पादन शुल्क मंत्री

2016 - महसूल मंत्रिपदावरून राजीनामा

2020 - भारतीय जनता पार्टी सोडली

2020 - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश

2022 - विधान परिषद सदस्य

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: लोकसभा निवडणुकांच्या अखेरच्या टप्प्यात अस्तित्वाचं 'राज'कारण

Maharashtra Election: नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बॅगांचं चेकिंग; चेकिंग नव्हे स्टंटबाजी, ठाकरे गटाचा आरोप

Swati Maliwal Assault Case : 'माझ्याबाबत जे घडलं ते,...; मारहाणीच्या घटनेनंतर आप नेत्या स्वाती मालीवाल यांची पहिली प्रतिक्रिया

Mega block : मध्य रेल्वेवर आजपासून पंधरा दिवस ब्लॉक; कोणत्या मार्गांवर होणार परिणाम? जाणून घ्या

Maharahstra Election: अजित पवार गेले कुठे? अखेरच्या टप्प्यात अजित पवारांची प्रचाराकडे पाठ?

SCROLL FOR NEXT