Eknath Khadse vs Girish Mahajan Saam Tv News
महाराष्ट्र

Maharashtra Politics : 'भाजपमध्ये गुंडाराज, त्या पक्षात जाण्याची इच्छा नाही'; एकनाथ खडसेंचं गिरीश महाजनांना प्रत्युत्तर

Eknath Khadse vs Girish Mahajan : 'मला भाजपमध्ये जायची आता अजिबात इच्छा नाही. भाजपमध्ये माझी जायची इच्छा होती. मात्र, बॉम्बस्फोटातील मुख्ख्य आरोपी दाऊद इब्राहिम सोबतच्या सलीम कुत्ता बरोबर नाचणाऱ्यांना भाजपमध्ये घेतल्यानंतर आता भाजपमध्ये गुंडांचं राज्य सुरू होईल'.

Prashant Patil

जळगाव : 'मला भाजपमध्ये जायची आता अजिबात इच्छा नाही. भाजपमध्ये माझी जायची इच्छा होती. मात्र, बॉम्बस्फोटातील मुख्ख्य आरोपी दाऊद इब्राहिम सोबतच्या सलीम कुत्ता बरोबर नाचणाऱ्यांना भाजपमध्ये घेतल्यानंतर आता भाजपमध्ये गुंडांचं राज्य सुरू होईल. त्यामुळे भाजपची आता जी प्रतिमा झाली आहे, त्यामुळे भाजपमध्ये जायची आता इच्छा नाही', असं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार तथा जळगावातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी म्हटलं होतं की, 'एकनाथ खडसेंची पुन्हा भाजपमध्ये येण्याची इच्छा आहे', यावर खडसेंनी आपलं स्पष्टीकरण दिलंय.

खडसे पुढे म्हणाले की, 'बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांबरोबर काम करण्याची माझी अजिबात इच्छा नाही. तसेच महायुतीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात एकमेकांविरुद्ध अविश्वासाचं वातावरण आहे. अजित पवार आम्हाला निधी देत नाही, यामुळे महायुतीत सर्व भानगडी आहेत. यावरून शिंदेंचे बहुसंख्य आमदार नाराजी व्यक्त करत आहेत', असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

'मी संघाचा स्वयंसेवक आहे, मी संघाच्या विचारांपासून कधीही वेगळा गेलो नाही. तुम्ही राष्ट्रवादीत जाऊ नका हे संघानं मला कधीही शिकवलं नाही. संघाचा विचार हा हिंदुत्ववादी विचार आहे. संघाचे विचार हे राजकीय विचार कधीच नसतात. समाजासाठी चांगलं काम केलं पाहिजे, हे संघाची शिकवण आहे. कुठल्याही पक्षात असलं तरी संघाने कधी विरोध केलेला नाही', असंही खडसेंनी स्पष्ट केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: खुनातील आरोपीची नांदेड ग्रामीण पोलिसांनी काढली धिंड

Mahadev Munde: शवविच्छेदन अहवाल उघड; महादेव मुंडेंच्या शरीरावर १६ वार, न्यायासाठी कुटुंब मनोज जरांगेंच्या भेटीला|VIDEO

Pune Accident : पुण्यात भीषण अपघात! ओव्हरटेक करताना टँकरची दुचाकीला धडक, दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

Mrunal Thakur: 'ब्राऊन ब्यूटी' धुळ्याच्या अभिनेत्रीचा स्वॅग, फोटो पाहून नजर हटणार नाही

Mumbai News : कांदिवलीत रिक्षा चालक व स्कूल बस कर्मचाऱ्यात मारामारी; वाहतूक ठप्प, विद्यार्थी बसमध्ये अडकली

SCROLL FOR NEXT