
पुणे : संपूर्ण राज्याचं लक्ष असलेल्या तथा बारामती तालुक्यातील प्रतिष्ठेची लढाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीला निकाल आज बुधवारी जाहीर झाला आहे. या निवडणुकीच्या मतमोजणीला काल मंगळवारी सुरुवात झाली होती. काल फक्त पहिल्या फेरीची मतमोजणी पार पडू शकली. त्यांनतर आज बुधवारी सकाळी साडेपाच वाजल्यापासून पुन्हा एकदा मतमोजणीला सुरुवात झाली आहे. आज सकाळपासून सुरु असलेल्या मतमोजणीच्या कलांनुसार माळेगाव साखर कारखान्यावर पुन्हा एकदा अजित पवार यांच्या निलकंठेश्वर पॅनलची सत्ता येण्याची दाट शक्यता आहे.
फक्त दोन जागा वगळता इतर कोणत्याही जागेवर अजित पवारांच्या पॅनलसमोर विरोधी उमेदवार टिकू शकले नाहीयत. एवढंच नाही तर अजित पवार यांच्या निलकंठेश्वर पॅनलसमोरील मुख्य प्रतिस्पर्धी असणाऱ्या सहकार बचाव पॅनलचे प्रमुख रंजन तावरे देखील पराभूत झाले आहेत. या निवडणुकीत त्यांचा ३५२ मतांनी पराभव झाला आहे. रंजन तावरे यांनी सहकार बचाव पॅनलचे नेतृत्त्व केलं होतं.
नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, माळेगाव साखर कारखान्याच्या २१ जागांपैकी १९ जागांवर अजितदादांच्या निलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार आघाडीवर आहेत. त्यांची विजयाच्या दिशेने भक्कम वाटचाल सुरु आहे. तर फक्त दोन जागांवर सहकार बचाव पॅनेलकडून अजितदादांच्या पॅनलला टक्कर मिळत आहे. यापैकी एक जागा सांगवीची असून येथून चंद्रकांत तावरे स्वत: निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर दुसऱ्या जागेवर जीबी गावडे हे आघाडीवर आहेत. मात्र, अजितदादांच्या पॅनेलचा विजयाचा सपाटा बघता या दोघांचा विजयही अद्याप तळ्यात मळ्यात असल्याचं मानलं जात आहे. त्यामुळे अजित पवार आता माळेगावच्या निवडणुकीत विरोधकांना २१-० असा व्हाईटवॉश देणार का? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
शरद पवारांचा अजितदादांना टोला
दरम्यान, बारामतीधील माळेगाव साखर कारखाना निवडणुकीकडे अख्ख्या राज्याचं लक्ष लागून आहे. यात शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचं पॅनल निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यामुळे या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झालं आहे. त्याचदरम्यान, या निवडणुकीवरून शरद पवारांनी अजित पवारांवर टीका केली आहे. 'सरकारमध्ये मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तींनी सहकारी संस्थांच्या निवडणुका लढवू नये, मी माझ्या ४० वर्षांच्या कारकिर्दीत सरकारी पदावर असताना कधीही सहकारी संस्थांच्या निवडणुका लढलो नाही', असं शरद पवार म्हणाले. ते बारामतीत पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारत असताना बोलले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.