
Malegaon Sakhar Karkhana Election Results : उपमुख्यमंत्री अजित पवार माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर सत्ता कायम ठेवणार असल्याचे चित्र आहे. पहिल्या फेरीमध्ये अजित पवारांच्या निळकंठेश्वर पॅनलने बाजी मारली. आता दुसऱ्या फेरीची मतमोजणी सुरू झाली आहे. अजित पवार यांच्या पॅनेलचे सतरा उमेदवार आघाडीवर आहेत. तर चंद्रराव तावरे यांच्या सहकार बचाव पॅनलचे केवळ चार उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळे अजित पवार यांच्या पॅनलची विजयाकडे वाटचाल सुरू असल्याचं दिसतेय.
माळेगाव तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निकालाची मतमोजणी सुरू होऊन २४ तास उलटल्यानंतरही एकच फेरी संपली. दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीला आता सुरूवात झाली आहे. पहिल्या फेरीत अजित पवार यांच्या पॅनले बाजी मारली. दुसऱ्या फेरीची मतमोजणी देखील जास्तवेळ चालण्याची शक्यता आहे. दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीच्या सुरूवातीच्या कलांमध्ये अजित पवारा यांच्या पॅनेलने बाजी मारली आहे.
तावरे यांच्या पॅनल मधून स्वतः चंद्रराव तावरे व रणजीत खलाटे सांगवी गटातून वीरसिंह गवारे बारामती गटातून व राजश्री कोकरे महिला राखीव मतदार संघातून आघाडीवर आहेत. दुसया फेरीमध्ये नेमके काय चित्र होते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. काही गटांमध्ये असणारा फरक हा किरकोळ असून या गटांमध्ये कोण आघाडी घेत बाजी मारतो याकडे आज दिवसभरात सर्वांचे लक्ष असेल.
पहिल्या फेरी अखेर मिळालेली उमेदवार निहाय मते खालील प्रमाणे
• अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ
कुमार भोसले अजित पवार गट-4117
बापूराव गायकवाड चंद्रराव तावरे गट-3717
• इतर मागास प्रवर्ग
नितीन कुमार वामनराव शेंडे अजित पवार गट -4120
रामचंद्र नाळे चंद्रराव तावरे गट -3644
• भटक्या जाती जमाती प्रवर्ग
विलास ऋषिकांत देवकाते अजित पवार गट- 4269
सूर्याची तात्यासो देवकाते चंद्रराव तावरे गट- 3288
• महिला राखीव प्रवर्ग
संगीता बाळासाहेब कोकरे- अजित पवार गट -2161
राजश्री कोकरे चंद्रराव तावरे गट 2022
ज्योती मुलमुले अजित पवार गट -1959
• माळेगाव गट
रणजीत जाधवराव अजित पवार गट 4332
बाळासाहेब तावरे अजित पवार गट 3803
राजेंद्र बुरुंगले अजित पवार गट 3707
संग्राम काटे चंद्रराव तावरे गट 3425
रमेश गोफणे चंद्रराव तावरे गट 2963
रंजन कुमार तावरे चंद्रराव तावरे गट 3587
• पणदरे गट
तानाजी कोकरे अजित पवार गट 3803
योगेश जगताप अजित पवार गट 4110
स्वप्निल जगताप अजित पवार गट 3716
रोहन कोकरे चंद्रराव तावरे गट 3314
रणजीत जगताप चंद्रराव तावरे गट 3050
सत्यजित जगताप चंद्रराव तावरे गट 3247
• सांगवी गट
गणपत खलाटे अजित पवार गट 4115
विजय तावरे अजित पवार गट 3645
वीरेंद्र तावरे अजित पवार गट 3332
चंद्रराव तावरे -4041
संजय खलाटे चंद्रराव तावरे गट-2961
रणजीत खलाटे चंद्रराव तावरे गट -3747
• खांडज शिरवली गट
प्रताप आटोळे अजित पवार गट 3995
सतीश फाळके अजित पवार गट 4117
मेघा शाम पोंदकुले चंद्रराव तावरे गट -3145
विलास सस्ते चंद्रराव तावरे गट- 3285
• नीरा वागज गट
जयपाल देवकाते अजित पवार गट -3862
अविनाश देवकते अजित पवार गट- 4289
केशव देवकाते चंद्रराव तावरे गट- 3179
राजेश देवकते चंद्रराव तावरे गट- 3254
• बारामती गट
नितीन सातव अजित पवार गट 3559
देविदास गावडे अजित पवार गट 3898
वीरसिंह गवारे चंद्रराव तावरे गट 3740
गुलाबराव गावडे चंद्रराव तावरे गट 3542
• ब वर्ग प्रवर्ग
अजित अनंतराव पवार -91
भालचंद्र बापूराव देवकाते -चंद्रराव तावरे गट 10 मते
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.