eknath shinde yandex
महाराष्ट्र

Eknath Shinde: श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार का? एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात दिलं उत्तर

Eknath Shinde On DCM Post: दरे गावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान केलंय.

Bharat Jadhav

महायुतीच्या सरकारमध्ये शिंदे गटाला उपमुख्यमंत्री मिळणार असल्याची चर्चा आहे. शिंदे गटाकडून उपमुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांचे पूत्र श्रीकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे. त्यावर खुद्द एकनाथ शिंदे यांनी दरे गावात मोठं विधान केलंय. उपमुख्यमंत्री बाबत चर्चा सुरू आहे. श्रीकांत शिंदे यांचे नाव पुढे येत आहे, ही चर्चा फक्त माध्यमांमध्ये असल्याचं विधान शिंदेंनी केलंय.

महायुतीमध्ये मंत्रिपदावरून ओढाताण सुरुय. सत्ता स्थापना आणि मुख्यमंत्रिपदाबाबत बैठक होण्याआधी एकनाथ शिंदे दरे गावाला गेले होते. दरे गावाला गेल्यानंतर शिंदेंची तब्येत खराब झाली होती. आज ते ठाण्याकडे निघाले आहेत. त्याआधी त्यांनी पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान केलं. शिंदे गटाकडे उपमुख्यमंत्री पद जाणार आहे. या पदासाठी श्रीकांत शिंदे यांचे नाव पुढे येत आहे. यावरून पत्रकारांनी एकनाथ शिंदेंना प्रश्न केला असून त्यावर शिंदेंनी उत्तर दिलंय.

मुख्यमंत्री म्हणून माझ्या नेतृत्वात निवडणुका झाल्या. त्यात मोठं यश मिळालं. त्यावेळी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व सहकारी सोबत होते. त्यानंतर महायुतीला प्रचंड मोठं यश मिळालं. श्रीकांत शिंदे हे उपमुख्यमंत्री होणार ह्या फक्त चर्चा आहेत. या चर्चा फक्त माध्यम प्रतिनिधींमध्येच आहेत. उपमुख्यमंत्रिबाबत एक बैठक अमित शहा यांच्यासोबत झालीय, आता दुसरी मोठी बैठक परत होणार आहे. या बैठकीत याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल. त्या

निर्णयातून महाराष्ट्राचं भलं होईल असा निर्णय घेतला जाईल. या जनेतेने आम्हाला भरभरून मते दिली आहेत. चांगलं सरकार स्थापन व्हावे ही इच्छा जनतेची आहे,आणि ते इच्छा पूर्ण करायची आहे, असं शिंदे म्हणालेत. महायुतीच्या सरकार स्थापनेसाठी बैठक होणार असतानाच एकनाथ शिंदे हे दरे गावाला गेले होते. दिवसाच्या विश्रांतीसाठी ते दरे गावाला गेले होते. त्याचदरम्यान त्यांची तब्येत खालावली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Shreyas Iyer: ‘योग्य वेळ आली की तो राज्य करेल’, वैभव सूर्यवंशीच्या भवितव्याबाबत श्रेयस अय्यरचा मोठा विश्वास

Pune News: माझ्या बॉयफ्रेंडला एड्स आहे, तरी मी त्याच्याशीच लग्न करणार, पुण्यामध्ये कॉलेजला गेलेली २२ वर्षीय तरुणी बेपत्ता

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

SCROLL FOR NEXT