Deepak Kesarkar  Saam Tv
महाराष्ट्र

Deepak Keskarkar: भाजप आणि सेनेत दुमत नाही, पण...; सामंतांच्या व्हॉट्सअप स्टेटसवर केसरकरांची प्रतिक्रिया

Bharat Jadhav

(सचिन बनसोडे)

Deepak Kesarkar On kiran Samant:

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून भाजपविरुद्ध शिंदे गटात सामना रंगण्याची शक्यता आहे. किरण सामंतांच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसमुळे दोन्ही पक्षात वाद होण्याची शक्यता आहे. त्याचदरम्यान शिंदे गटाचे नेते आणि राज्य शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी त्यावर प्रतिक्रिया देत तो मतदारसंघ शिवसेनाचा अधिकार असल्याचं म्हटलं. दरम्यान भाजप आणि शिवसेनेत दुमत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. (Latest News)

दीपक केसरकर हे आज शिर्डीत आले होते. तेथे त्यांनी साईबाबांचे दर्शन घेतले त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. अगोदर केलेल्या सर्व संकल्पांची पूर्ती व्हावी. मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्री दिवसरात्र काम करताहेत. नवीन वर्षात सर्वांच्या घरी सुख समृद्धी यावी. माझ्या विभागातील दोन कोटी मुलांचे भवितव्य चांगले घडावे ही प्रार्थना, केल्याचं केसरकर म्हणाले. याचदरम्यान त्यांनी किरण सामंत यांच्या स्टेट्सवरही प्रतिक्रिया दिली.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

किरण सामंत हे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांचे बंधू किरण सामंत यांचं बंधू आहेत. किरण सामंत यांनी 'मी किरण रवींद्र सामंत… रोकेगा कोण?’असं व्हॉट्सअप स्टेट्स ठेवलं. त्यानंतर भाजपकडून रविद्र चव्हाण यांना तयारीला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या. भाजपने केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची मागणी केल्यामुळे शिंदे गट आक्रमक झाल्याचं म्हटलं जात आहे.

याच सर्व प्रकरणावरून राज्य शालेय शिक्षणमंत्री (Education Minister) दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी प्रतिक्रिया दिलीय. सिंधुदुर्ग लोकसभेच्या (Sindhudurg Lok Sabha) जागेवर शिवसेनेचा अधिकार आहे. मात्र वरिष्ठ जो उमेदवार (candidate) देतील तो आपण निवडून आणू ,असं म्हटलंय. शिवसेनेकडे दोनवेळा हा मतदारसंघ राहिला आहे. त्यामुळे सेनेकडे असावा हा अधिकार, असल्याचं ते म्हणाले. त्याचवेळी त्यांनी भाजप आणि सेनेत उमेदवारावरून कोणतेच दुमत नसल्याचं स्पष्टीकरण देत, वरिष्ठ जो उमेदवार ठरवतील त्यास निवडून आणू असं म्हटलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sri Lanka Tourism : श्रीलंकेत मनसोक्त आणि कमी खर्चात फिरता येणार; कसं वाचा संपूर्ण डिटेल्स

IOCL Recruitment: इंडियन ऑइलमध्ये अधिकारी होण्याची संधी; या पदासाठी सुरु आहे भरती; वाचा संपूर्ण माहिती

Nandurbar News : नंदुरबार दंगल..दगडफेक करणाऱ्या ४० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात; शहरात तणावपूर्ण शांतता

Manoj Jarange Patil: उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती खालावली; मनोज जरांगेंचा उपचार घेण्यास नकार

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

SCROLL FOR NEXT