बालाजी सुरवसे, धाराशिव प्रतिनिधी
Yogesh Kadam Defends Dada Bhuse on Peper Leak Row : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) पेपर फुटी प्रकरणात शिक्षण मंत्र्यांना दोषी धरणे शंभर टक्के चुकीचे आहे. या प्रकरणात शिक्षण मंत्र्यांचा कोणताही दोष नाही, असे म्हणत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांची पाठराखण केली आहे. MPSC ही एक स्वायत्त आणि स्वतंत्र संस्था (मंडळ) असल्याने या घटनेचा आणि शिक्षण मंत्र्यांचा थेट संबंध जोडणे पूर्णपणे अयोग्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
धाराशिवमधील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, पेपर फुटीच्या घटनांवर राजीनामा घेणे हा काही अंतिम पर्याय किंवा उत्तर असू शकत नाही. तर यासाठी संपूर्ण सिस्टीम बदलणे आवश्यक आहे. MPSC वर मंत्रालयातील अधिकाऱ्यांऐवजी वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. पेपरफुटीत शिक्षणमंत्र्यांचा दोष नाही.
लाखो विद्यार्थी या स्पर्धा परीक्षा देतात, त्यामुळे त्यांच्या भवितव्याची आणि सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी MPSC च्या सुरक्षेचे मॉनिटरिंग करण्यासाठी एका IPS दर्जाच्या अधिकाऱ्याची तिथे नियुक्ती असायला हवी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
पूर्वी विठ्ठल मोरे यांच्यासारख्या वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांनी MPSC मध्ये काम करताना अत्यंत उत्तम आणि पारदर्शक सिस्टीम बसवली होती. त्याच धर्तीवर पुन्हा एकदा तशाच कार्यक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी, असा पुनरुच्चार गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केला.
MPSC चे अध्यक्ष, सचिव आणि उपसचिव पदांवर मंत्रालयीन कॅडरऐवजी वरिष्ठ IAS अधिकारी असले पाहिजेत, अशी मागणी गृहराज्यमंत्री योगेश कदम मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ते धाराशिवमध्ये बोलत होते. पूर्वी विठ्ठल मोरे (IAS) कार्यरत असताना MPSC मध्ये अत्यंत पारदर्शक काम झाले होते आणि कोणतीही पेपरफुटी झाली नव्हती, असे त्यांनी नमूद केले.
MPSC च्या सध्याच्या अधिकाऱ्यांचा राजीनामा घेणे हा योग्य पर्याय नसून व्यवस्थेत सुधारणा (Reforms) करणे गरजेचे आहे. सुरक्षेच्या दृष्टीने आणि पेपरफुटी रोखण्यासाठी एका IPS अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, जेणेकरून सुरक्षेचे आणि संपूर्ण व्यवस्थेचे योग्य मॉनिटरिंग (Supervision) होईल. मागील पेपरफुटी प्रकरणाचा तपास मुंबई क्राइम ब्रांचने अत्यंत प्रभावीपणे केला होता, त्यातून शिकवण घेऊन गृहविभागाच्या सहकार्याने सुरक्षा अधिक कडक केली पाहिजे, असेही योगेश कदम म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.