Mens Fitness : पुरुषांनो! वयाची ४५ वर्षे पूर्ण केलीत, 'या' ३ गोष्टी करू शकलात तर समजा तुम्ही आहात फिट अँड फाईन

Shreya Maskar

४५ वर्षांनंतर पुरुषांचा फिटनेस

४५ वर्षांनंतर पुरुषांमध्ये फिटनेसचा अर्थ फक्त वजन कमी असणे किंवा जिममध्ये जाणे असा नाही. हृदयाची क्षमता, स्नायूंची ताकद, संतुलन, लवचिकता आणि रोजची कामे दमल्याशिवाय करण्याची क्षमता पाहणे महत्त्वाचे आहेत.

Men's Fitness After 45 | pinterest

३० मिनिटे वेगाने चालणे

जास्त दमछाक किंवा असामान्य त्रास न होता वेगाने चालता येणे गरजेचे आहे. चालताना छातीत दुखणे, चक्कर येणे किंवा असामान्य श्वास लागणे जाणवल्यास ते दुर्लक्षित करू नये.

Brisk Walking for 30 Minutes | pinterest

खुर्चीचा आधार न घेता उठता-बसता येणे

खुर्चीतून हातांचा आधार न घेता वारंवार उठणे-बसणे, हे पाय आणि कंबरेच्या स्नायूंची ताकद तपासण्याचा सोपा मार्ग आहे. वयानुसार ही ताकद टिकवणे दैनंदिन हालचालींसाठी महत्त्वाचे आहे.

Sitting Down Without Chair Support | pinterest

जिने चढता येणे

दैनंदिन आयुष्यात काही मजले जिने चढताना खूपच दम लागणे किंवा वारंवार थांबावे लागणे हे फिटनेस कमी असल्याचे संकेत असू शकतात.

Climbing Stairs | pinterest

हलके वजन उचलणे- नेणे

घरातील सामान, किराणा किंवा इतर दैनंदिन वस्तू योग्य पद्धतीने उचलून काही अंतर चालता येणे महत्त्वाचे आहे. वजन उचलताना योग्य posture ठेवणे गरजेचे असते.

Lifting and Carrying Light Weights | pinterest

एका पायावर उभे राहणे

एका पायावर उभे राहून तुम्हाला शरीराचे संतुलन राखता आले पाहिजे. संतुलन चांगले राहणे विशेषतः वाढत्या वयात महत्त्वाचे असते.

Standing on One Leg | pinterest

जमिनीवर बसून उठणे

जमिनीवर बसल्यानंतर फारसा आधार न घेता उठता येणे शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीचे महत्त्वाचे लक्षण आहे. यासाठी पाय, कंबर आणि शरीराच्या मध्यभागातील स्नायूंची ताकद व हालचालींची क्षमता आवश्यक असते.

seated position on the floor | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : हार्ट अटॅक येण्यापूर्वी पायांवर दिसतात 'हे' ५ संकेत, वेळीच व्हा सतर्क

Heart Attack | AI PHOTO
येथे क्लिक करा...