ED Raids ex civic chief  saam tv
महाराष्ट्र

ED Raids : माजी आयुक्त अनिलकुमार पवारांच्या घरी ईडीचा छापा; संपत्ती जाणून डोळे पांढरे होतील, वाचा स्पेशल रिपोर्ट

ED Raids ex civic chief : वसई विरार महापालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या निवासस्थानी ईडीनं छापेमारी केली. मात्र या छापेमारीआधी नेमकं काय झालं? महापालिका भ्रष्टाचाराचं कुरण कशी झालीय? भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कुणाचा वरदहस्त आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....

Suprim Maskar

वसई विरार महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अनिलकुमार पवारांच्या निरोप समारंभाची ही दृश्य...28 जुलैच्या या निरोप समारंभात सत्ताधारी आणि विरोधकही हजर होते. मात्र दुसऱ्याच दिवशी सकाळी आयुक्तांच्या दारात ईडीचे अधिकारी हजर झाले. आणि आयुक्तांनी जमवलेली सगळी माया समोर आली.आयुक्तांच्या शासकीय निवास्थानातून कागदपत्र, हार्ड डिस्कसह मोठा डेटा, आणि 1 कोटी रुपये जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. एवढंच नाही तर आयुक्तांनी आत्तापर्यंत जमवलेली संपत्तीही समोर आलीय.

माजी आयुक्त अनिल पवारांची मालमत्ता

नाशिकच्या सटाण्यात शेतजमीन, फार्म हाऊस

किंमत - 16 लाख रुपये

सटाण्यातील फ्लॅट

किंमत - 30 लाख रुपये

बागलाणच्या आरईमध्ये 3 ठिकाणी प्लॉट्स

किंमत - 1 कोटी 27 लाख

पाथर्डी तालुक्यात प्लॉट

किंमत - 50 लाख रुपये

पुण्यातील शिवाजीनगर परिसरात आलिशान फ्लॅट

किंमत - 1 कोटी 94 लाख

दरम्यान, निरोप समारंभानंतर महत्त्वाची कागदपत्रं पवार घेऊन गेल्याचा आरोप केला जातोय. एवढंच नाही तर आयुक्तांच्या निवासस्थानी बांधकाम व्यावसायिक, कॉन्ट्रेक्टर याची बैठक झाल्याचीही चर्चा आहे. ईडीची छापेमारी नालासोपाराच्या 41 अनधिकृत इमारत प्रकरणी झाल्याचं सांगितलं जातयं.. तसचं आयुक्तांशी संबंधित 12 ठिकाणीही छापेमारी करण्यात आलीय.

भ्रष्ट आयुक्तांवर ED चा छापा

पवार यांच्यावर अवैध आणि बेहिशेबी माया जमवल्याचा आरोप

250 ते 200 इमारतींना Offline CC दिल्याची माहिती

मलनिस्सारण प्रकल्प आणि कचरा डेपोच्या आरक्षित जागेवर अनधिकृत बांधकामाला परवानगी

बदलीच्या अखेरच्या दिवशी अनेक फाईल मंजूर केल्याचा आरोप

दुसरीकडे आयुक्तांवर ईडीची छापेमारी झाल्यानंतर कामणमधील नागरिकांनी जल्लोष साजरा केला.

राज्यात आतापर्यंत अनेक अधिकाऱ्यांवर, भ्रष्टाचाराचे आरोप झालेत.मात्र कालांतरानं निर्दोष मुक्तता करण्यात आलीय. वसई विरार शहराच्या दुर्दशामुळे माजी आयुक्त अनिलकुमार पवारांवर अनेक आरोप झाले. मात्र आरोपानंतर आणि आता ईडीच्या छापेमारीनंतर पवारांवर नेमकी काय कारवाई होणार? की राजकीय लागेबंधे वापरून पवार स्वत:ची आरोपातून मुक्तता करून घेणार... हे पाहणं महत्त्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Afghanistan Pakistan Tension: अफगाणिस्तानने थोपटले दंड; पाकिस्तानच्या संरक्षणमंत्री आणि ISI प्रमुखांना व्हिसा देण्यास नकार

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांची महाष्ट्राच्या राजकारणात होणार एन्ट्री? कोण काय म्हणालं? वाचा स्पेशल रिपोर्ट

Nashik Crime: नाशिक जिल्हा....; पुस्तकांऐवजी बॅगेत कोयता अन् चॉपर, महाविद्यालीन विद्यार्थ्यांमध्ये भाईगिरीचे फॅड

Hindu Festivals: रक्षाबंधन आणि भाऊबीजमध्ये काय फरक आहे?

Virat Kohli : लिलावापूर्वी करार करण्यास नकार, IPL 2026 मध्ये विराट कोहली RCB कडून खेळणार की नाही?

SCROLL FOR NEXT