BJP MP Ranjeetsingh Nimbalkar Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics : राष्ट्रवादीच्या ५ बड्या नेत्यांची ED चौकशी लवकरच?; भाजप खासदाराचा खळबळजनक दावा

खासदार निंबाळकर आज पंढरपूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी हा गौप्यस्फोट केला

भारत नागने

पंढरपूर : राष्ट्रवादीच्या (NCP) पाच मोठ्या नेत्यांची लवकरच ईडीकडून (ED) चौकशी होणार. अशी खळबळजनक माहिती माढ्याचे भाजप (BJP) खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांनी आज दिली. लवासा आणि जलसंपदा विभागात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणात राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा समावेश असल्याचा दावाही खासदार निंबाळकर यांनी केला. खासदार निंबाळकर यांच्या या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. (NCP Latest Marathi News)

खासदार निंबाळकर आज पंढरपूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. राज्यात एकीकडे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरलं आहे. तर दुसरीकडे खासदार निंबाळकर यांनी हा दावा केल्याने भाजपकडून विरोधकांवर दबाव तर आणला जात नाहीये ना? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

विशेष बाब म्हणजे, दोन दिवसांपासून माजी उपमुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर कारवाई होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अशातच भाजपचे खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांनी अजित पवार यांचे नाव न घेता राष्ट्रवादीच्या 10 पैकी 5 नेत्यांवर लवकरच कारवाई होणार असल्याची माहिती दिली आहे.

दरम्यान, निंबाळकर यांच्या दाव्यामुळे आता ईडीच्या रडाडवर असलेले राष्ट्रवादीचे ५ बडे नेते कोणते अशी चर्चा सुरू झाली आहे. 'राष्ट्रवादीमध्ये अनेक चोर आहेत, त्यातील कोणता चोर नेता आहे. हे देखील लवकरच समोर येणार आहे. लवासा प्रकरणी सुप्रीम कोर्टाने बारा वर्षानंतर समन्स बजावले आहे. यामध्ये सरकारने कारवाई करण्याचे धोरण ठरवले असेल तर यातून मोठा घोटाळा बाहेर येईल' असेही खासदार निंबाळकर यांनी सांगितले.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आपण सोबत निवडणूक लढलो...पक्षप्रवेशावरील नाराजीच्या चर्चेवर एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, VIDEO

Maharashtra Live News Update: महाबळेश्वरमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या विरोधात ठिय्या आंदोलन

Maharashtra Politics : घराणेशाहीचा रेकॉर्ड मोडला; भाजप अन् शिंदे गटाकडून एकाच कुटुंबातील ६ जणांना उमेदवारी

Winter Health: हिवाळ्यात दिवसभर किती लिटर पाणी प्यावे?

ऐन निवडणुकीत IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या कोणत्या अधिकाऱ्याची कुठे झाली बदली?

SCROLL FOR NEXT