Baramati ED Raid Saam Tv
महाराष्ट्र

ED Raid: नागपुरात हिवाळी अधिवेशन तापले, बारामतीत ३ ठिकाणी ईडीची छापेमारी; रोहित पवारांच्या निकटवर्तीयांवर कारवाई

Baramati ED Raid: बारामतीमधील ३ ठिकाणी पहाटेपासून ईडीची छापेमारी सुरू आहे. आमदार रोहित पवार यांचे निकटवर्तीय आनंद लोखंडे आणि विद्या लोखंडे यांच्या घरांवर ईडीची धाड पडली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Priya More

Summary -

  • बारामतीमध्ये ३ ठिकाणी ईडीची छापेमारी

  • जालोची वाडी, खताळ पट्टा आणि झारगडवाडी येथे पहाटेपासून ईडीची छापेमारी सुरू

  • आनंद लोखंडे आणि विद्या लोखंडे यांच्या घरावर ईडीची धाड

  • १० कोटींच्या डेअरी फसवणुकीचे गंभीर आरोप

बारामतीमध्ये आज सकाळपासून ईडीची छापेमारी सुरू आहे. बारामती तालुक्यातल्या जालोची वाडी, खताळ पट्टा आणि झारगडवाडी येथे आज पहाटेपासून ईडीकडून छापेमारी सुरू आहे. आनंद लोखंडे आणि विद्या लोखंडे यांच्या घरांवर ईडीची धाड पडली आहे. जालोचीवाडी या लोखंडेंच्या मूळगावात ही छापेमारी सुरू आहे. या दोघांनी पुणे आणि मुंबईतील दूध डेअरीवाल्यांना तब्बल १० कोटींचा गंडा घातला. त्याप्रकरणातच ईडीची ही कारवाई सुरू आहे.

बारामतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून लोखंडे यांनी केलेल्या फसवणुकीचे प्रकरण गाजत आहे. लोखंडे दाम्पत्यांनी दूध आणि डेअरी उत्पादनात गुंवडणूक केल्यास डबल नफा मिळेल असे आमिष दाखवत अनेकांची फसवणूक केली. पुणे आणि मुंबईतील अनेक डेअरी व्यावसायिकांची या दोघांनी १० कोटी रुपयांची फसवणूक केली. मुंबई युएडब्ल्यूकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

विशेष म्हणजे, लोखंडे हा आमदार रोहित पवार यांचा निकटवर्तीय असल्याची चर्चा आहे. त्याने शेतकऱ्यांच्या सातबारावर पतसंस्थांचे कर्ज काढून फसवणूक केल्याच्या तक्रारी आहेत. लोखंडेने मतदारसंघात कोट्यवधींचा खर्च केल्याची माहितीही समोर येत आहे. आनंद लोखंडेंवर राजकीय ओळखींमुळे कारवाई होत नसल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू होती. पण आता अचानक ईडीने छापेमारी केल्यामुळे बारामतीत याची जोरदार चर्चा होत आहे.

दरम्यान, ईडीचे पथक पहाटेपासून बारामतीतील लोखंडे यांच्या मूळगावी आहे. ईडीच्या पथकाकडून घरातील कागदपत्रे, आर्थिक व्यवहाराशी संबंधित नोंदी आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त केले जात आहे. या फसवणूक प्रकरणात अद्याप कुणाला अटक किंवा अधिकृत कारवाई झाली नाही. पण महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ईडीच्या या धाडीसत्रामुळे बारामतीमधील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : माघी गणेश जयंती निमित्ताने दगडूशेठ दर्शनासाठी गर्दी...

Ladki Bahin Yojana: ती एक चूक अन् लाडक्या बहि‍णींचे ₹१५०० बंद; केवायसी करुनही पैसे नाही; कारण काय?

Nagpur : प्रेमातील नकार पचवता आला नाही, तरूणीची घरात घुसून हत्या, गळा दाबला अन् डोके भींतीवर आदळले

Ganesh Jayanti auspicious rituals: आज गणेश चतुर्थी; गौरी-गणेश जयंतीनिमित्त पंचांगात काय विशेष?

Sleepy after eating rice: भात खाल्ल्यानंतर प्रचंड झोप येते?

SCROLL FOR NEXT