hingoli News Saam Tv
महाराष्ट्र

Hingoli Earthquake : हिंगोली भूकंपाने हादरलं, १० गावांतील नागरिकांची भीतीने पळापळ

Hingoli Earthquake update : हिंगोली पुन्हा एकदा भूकंपाने हादरली. या भूकंपाच्या धक्क्यामुळे लोकांची पळापळ झाली.

संदीप नागरे

हिंगोली जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे हादरे

औंढा तालुका भूकंपाने हादरला

भूकंपामुळे गावकऱ्यांची पळापळ

हिंगोली जिल्हा पुन्हा एकदा भूकंपाने हादरला आहे. काही दिवसांपूर्वी वसमत तालुक्याला भूकंपाचे धक्के बसले होते. त्यानंतर आज बुधवारी हिंगोलीतील औंढा तालुका भूकंपाने हादरला आहे. या भूकंपाने गावातील लोकांची एकच पळापळ झाली. या घटनेने गावकऱ्यांची एकच भीती पसरली.

हिंगोलीच्या वसमतमध्ये ३ डिसेंबर रोजी रात्री १० वाजून ४९ मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले होते. पांगरा शिंदे आणि परिसराला भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भागात भूगर्भातून अचानक मोठा आवाज आल्यानंतर जमीन हादरली होती. त्यानंतर आज पुन्हा भूकंपाने हिंगोलीकरांची झोप उडवली.

हिंगोलीतील औंढा तालुक्यातील दहा गावे भूकंपाने हादरली. या तालुक्यातील पिंपळदरी गावात नागरिक भीतीने रस्त्यावर उतरले होते. याआधी देखील भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपानंतर लोक घाबरून रस्त्यावर आले. लहान मुलेही घराबाहेर आले. गेल्या काही आठवड्यांपासून येणाऱ्या भूकंपामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे.

कोणत्या गावांना बसले भूकंपाचे हादरे?

हिंगोली जिल्ह्याला पुन्हा भूकंपाचे हादरे बसलेत. हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील दहा गावांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याची माहिती मिळत आहे. पिंपळदरी, राजदरी ,सोनवाडी ,जामगव्हाण, पांगरा, आमदरी, जलाल धाबा, फुलदाबाद, कंजारा,यासह परिसरातील दहा गावांमध्ये हा भूकंपाचा धक्का जाणवला.

भूकंपाचा हादरा बसताच झोपलेले नागरिक घराच्या बाहेर येऊन थांबले. भूकंपाच्या या धक्क्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरलं. मात्र प्रशासनाने नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केलं. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं नागरिकांनी पालन करावे, असे आवाहन हिंगोली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने करण्यात आलं. तर हिंगोली चे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी देखील भूकंपाचे धक्के जाणवलेल्या गावातील नागरिकांची स्थानिक महसूल प्रशासनामार्फत माहिती घेण्यास सुरुवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raksha Bandhan 2026 : 27 की 28 ऑगस्ट रक्षाबंधन कधी? जाणून घ्या योग्य तारीख आणि मुहूर्त

Property Rights: एखाद्या विधवेने मूल दत्तक घेतले, तर मुलाला पतीच्या मालमत्तेत हिस्सा मिळेल का? कायदा काय सांगतो?

Maharashtra News Live Update: बदलापुरात भूसंपादनाचा मोबदला लाटल्याचा धक्कादायक प्रकार

Maharashtra SIR Update : महाराष्ट्रातील २ कोटी मतदार वगळणार?

Mumbai : मुंबईत धावत्या लोकलवर दगडफेक; तरुणाचा व्हिडिओ व्हायरल, कठोर कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT