सध्या मराठी डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या प्रमाणात स्पर्धा सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. या स्पर्धेत ई-सकाळने त्यांची मेहनत, जिद्द आणि ताकद दाखवत कॉमस्कोर रेटिंगमध्ये मराठी न्यूज वेबसाईटमध्ये सलग दुसऱ्यांदा नंबर १ स्थान पटकावले आहे. मराठी वाचक नेहमीच घडामोडी जाणून घेण्यासाठी ई-सकाळला प्रथम प्राधान्य देत आले आहेत.
ई- सकाळने डिजिटल न्यूज क्षेत्रात त्यांची उत्तम कामगिरी दाखवली आहे. वाचकांना नेहमी अचूक, जलद आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचं काम नेहमीच ई- सकाळ करते. त्यामुळे कॉमस्कोरमध्ये उच्चांक गाठता आला आहे.
ई- सकाळमध्ये तुम्हाला बदलता ट्रेंड, ताज्या घडामोडी, राजकारण, देश-विदेशमधील घटना, लाइफस्टाईल, तंत्रज्ञान, मनोरंजन अशा अनेक विषयांच्या घडामोडी वाचकांना वाचायला मिळतात. 2025 मधील कॉमस्कोरच्या आकडेवारीनुसार, मराठी न्यूज आणि माहिती देणाऱ्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये ई-सकाळने अव्वल स्थान पटकावले आहे.
सलग मिळालेल्या या यशामुळे ई-सकाळने मराठी डिजिटल पत्रकारितेत नवा मापदंड तयार केला आहे. दर्जेदार मजकूर आणि विश्वासार्हतेमुळे वाचकांचा ई-सकाळवरचा विश्वास अधिक मजबूत झाला आहे. सकाळ मीडिया समूहाच्या स्पष्ट डिजिटल व्हिजन आणि नाविन्यपूर्ण धोरणांमुळे ई-सकाळने डिजिटल माध्यमांमध्ये आपले नेतृत्व टिकवून ठेवले आहे.
आगामी काळात अत्याधुनिक तंत्रज्ञान, नवनवीन प्रयोग आणि वाचकांच्या गरजांवर आधारित माहितीच्या जोरावर ई-सकाळ डिजिटल पत्रकारितेत नवे उच्चांक गाठत राहील, असा विश्वास आहे.