Dwarka to Nashik Road highway set for major expansion with a 6-lane upgrade to ease traffic congestion in Nashik. saam tv
महाराष्ट्र

केंद्र सरकारचं मोठं गिफ्ट! नाशिकला मिळाला 10 पदरी महामार्ग; शहरातील वाहतूक कोंडी सुटणार

Dwarka To Nashik Road 6 Lane Expansion Project Details: नाशिकमधील द्वारका ते दत्त मंदिर (नाशिकरोड) महामार्ग रुंदीकरण प्रकल्पाला अखेर मंजुरी मिळाली आहे. सुमारे २२० कोटींच्या या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन शहरातील दळणवळण अधिक सुरळीत होणार आहे.

Omkar Sonawane

नाशिक : शहराच्या वाहतूक व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा द्वारका सर्कल ते दत्त मंदिर (नाशिकरोड) हा ६.४ किलोमीटरचा महामार्ग रुंदीकरण प्रकल्प अखेर अंतिम मंजुरीच्या टप्प्यातून मार्गी लागला आहे. सुमारे २२० कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला राज्य वित्तीय आयोग आणि केंद्रीय वाहतूक आणि दळणवळण मंत्रालयाची अंतिम मान्यता मिळाल्याने महापालिकेला मोठा दिलासा मिळाला आहे.

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाढत्या वाहतूक ताणाचा विचार करता हा प्रकल्प निर्णायक ठरणार आहे. मुख्य रस्ता सहा लेनचा करण्यात येणार असून, दोन्ही बाजूंना सर्व्हिस रोड उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे द्वारका, नाशिकरोड आणि दत्त मंदिर परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे. मार्चमध्ये सुरू झालेली निविदा प्रक्रिया काही तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे रखडली होती. मात्र, महापौर हिमगौरी आडके-आहेर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर दिल्लीतील उच्चस्तरीय बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात आला.

शुक्रवारी (दि. ८) दिल्ली येथे महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर या कामाला हिरवा कंदील मिळाला. आता मे महिन्याच्या अखेरीस प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असून, मार्च २०२७ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने द्वारका ते दत्त मंदिर हा मार्ग वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. लाखो भाविक आणि वाहनांची ये-जा लक्षात घेता या मार्गाचे रुंदीकरण अपरिहार्य झाले होते. सध्या अरुंद रस्ता आणि वाढती वाहतूक यामुळे दररोज कोंडी निर्माण होत होती. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वाहतूक सुरळीत होऊन कुंभमेळ्यादरम्यान शहरातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होईल.

सहा लेनसह सर्व्हिस रोडची सुविधा

या प्रकल्पाअंतर्गत मुख्य महामार्ग सहा लेनचा करण्यात येणार आहे. त्यासोबतच दोन्ही बाजूंना स्वतंत्र सर्व्हिस रोड तयार केले जाणार आहेत. यामुळे स्थानिक आणि महामार्गावरील वाहतूक वेगळी होऊन अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. तसेच व्यापारी, नागरिक आणि स्थानिक वाहनधारकांना सहज प्रवास करता येणार आहे. नियोजनबद्ध रस्ते विकासामुळे परिसराचा विकासही वेगाने होण्याची शक्यता आहे.

मार्च २०२७ पर्यंत पूर्णत्वाचे लक्ष्य-

महापालिकेने या प्रकल्पासाठी मार्च २०२७ पर्यंतची मुदत निश्चित केली आहे. निविदा प्रक्रियेला सुरुवात मार्चमध्ये झाली होती. मात्र प्रतिसाद कमी मिळाल्याने मुदत वाढवावी लागली. आता अंतिम मंजुरी मिळाल्याने कामाच्या अंमलबजावणीला गती मिळणार आहे. मे महिन्याच्या अखेरीस काम सुरू करून टप्प्याटप्प्याने बांधकाम पूर्ण केले जाणार आहे. प्रशासनाने यासाठी विशेष नियोजन आखले असून, वेळेत काम पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे. राज्य वित्तीय आयोग आणि वाहतूक व दळणवळण मंत्रालयाकडून द्वारका-नाशिकरोड महामार्ग रुंदीकरण प्रकल्पाला अंतिम मंजुरी मिळाली आहे. मे महिन्याच्या अखेरीस प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येईल. सुमारे २२० कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळेल असा विश्वास महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: चंद्रपुरात खळबळ, एकाचवेळी ३ अल्पवयीन मुलं बेपत्ता

Moong Dal Chilla Recipe: सकाळी करा नाश्ता हेल्दी, झटपट बनवा टेस्टी मूग डाळ चिल्ला, वाचा रेसिपी

Hair Care: केसगळती कमी करायची आहे? मग 'हे' घरी बनवलेलं हेअर वॉटर अंघोळी केल्यानंतर १ स्प्रे करा

मराठवाड्यात 500 च्या नोटांचा तुटवडा; तुळजापूरमध्ये व्यापाऱ्यांना फटका

प्रशासनात मोठे फेरबदल! मुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये; १६ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या

SCROLL FOR NEXT