Amol Mitkari performed Ravan Aarti Saamtv
महाराष्ट्र

Amol Mitkari News: मोठी बातमी! अमोल मिटकरींनी केली रावणाची आरती, मंदिरासाठी २० लाखांचा निधीही दिला

Amol Mitkari performed Ravan Aarti: अमोल मिटकरी यांनी गेल्यावर्षी आपल्या आमदार निधीतून 20 लाखांचा निधी मंदिराच्या सभागृह आणि जीर्णोद्धारासाठी दिला होता. यानंतर राज्य आणि देशभरात मोठा गदारोळ उडाला होता.

Gangappa Pujari

अक्षय गवळी, अकोला

Amol Mitkari News: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, आमदार अमोल मिटकरी यांनी आज अकोला जिल्ह्यातील सांगोळा गावात रावणाची महाआरती केली. यावरुन आता नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी आमदार अमोल मिटकरींनी सांगोळा गावातील रावण मंदिराचा जिर्णोद्धार करण्याची भूमिका मांडल्यानंतर देशभरात मोठा गदारोळ निर्माण झाला होता. अशातच आता दसऱ्यादिवशी अमोल मिटकरी यांनी रावणाची आरती केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

देशभरात दसऱ्याचा उत्साह अन् जल्लोष पाहायला मिळत आहे. दसऱ्या दिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी आज सांगोळ्यात जात रावणाची महाआरती केली आहे. अमोल मिटकरी यांनी गेल्यावर्षी आपल्या आमदार निधीतून 20 लाखांचा निधी मंदिराच्या सभागृह आणि जीर्णोद्धारासाठी दिला होता. यानंतर राज्य आणि देशभरात मोठा गदारोळ उडाला होता. अशातच आता परत मिटकरींनी सांगोळ्यात येत रावनदहनाच्या परंपरेवर देशभरात बंदीची मागणी केली आहे.

अकोल्यापासून 50 किलोमीटरवर असलेल्या पातूर तालूक्यातील सांगोळा ही पूजा पार पडली. या गावाच्या अगदी सुरूवातीलाच एका मंदिरवजा चौथऱ्यावर रावणाची एक अतिशय सुंदर, रेखीव मूर्ती आहे. सुमारे अडीचशे वर्षांची परंपरा असलेल्या या मूर्तीला असून रावणदहनाच्या प्रथेवर बंदी आणण्याची मागणी आदिवासी समाजाने केली आहे. याच मुर्तीची अमोल मिटकरी यांनी पूजा केली. आमदार मिटकरींच्या मागणीनंतर या विषयावरून पून्हा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहेत.

दरम्यान, "रावण हा ज्ञानी आणि सत्पुरूष होता. रावणाला जाळणारे रामासारखे पवित्र आहेत का? रावणाने सीतेचं एका बापाच्या भूमिकेतून अपहरण करीत तिला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला होता. मागच्या वर्षी मी रावणमंदिराच्या जिर्णोद्धाराचा निर्णय घेतल्यानंतर मला राजकीय अडचण झाली. मला तो निर्णय मागे घ्यावा लागला. आता सामजिक संघटनांच्या मदतीने मंदिराचा जिर्णोद्धाराचे प्रयत्न करू," असेही अमोल मिटकरी यावेळी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट, धो धो पाऊस कोसळणार

Horoscope Saturday Update : शत्रु त्यांचे काम करतील, तुम्ही तुमचे काम करा; आजचे राशीभविष्य

Indian Railway: रिल्स बनवणाऱ्यांनो ऐकलं का? रेल्वे स्टेशनवर रील बनवाल तर याद राखा, नेमकी काय कारवाई होणार?

अगं बाई! विदेशातही पोहोचला महाराष्ट्राचा ठसका! इटालियन महिलांनी गायले मराठी गाणं 'आता वाजले की बारा'

HSRP नंबर प्लेट बसवण्याची शेवटची तारीख जवळ येतेय, ऑनलाइन रजिस्ट्रेशन कसं करावं? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT