Eknath Shinde Saam TV
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्याच्या भाषणादरम्यान विद्यार्थ्यांची घोषणाबाजी; मुख्यमंत्री म्हणाले, अरे आम्हाला दोन महिने...

'आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्ष साजरा करत आहोत, त्याचप्रमाणे मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करतोय.'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवनीत तापडिया -

औरंगाबाद: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज औरंगाबादमध्ये (Aurangabad) मराठवाडा मुक्ती संग्रामदिन अमृतमहोत्सव समितीच्या विभागीय परिषदेला उपस्थित राहिले होते. यावेळी ते भाषणासाठी उभे राहिले असता 'प्राध्यापक भरती झालीच पाहिजे., अशी उपस्थित विद्यार्थ्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी मुख्यमंत्री (Eknath Shinde) म्हणाले, अरे सत्तेत येऊन आम्हाला दोन महिनेच झाले, जरा दम धरा, ७५ हजार प्राध्यापक भर्ती करण्याचा निर्णय आम्ही घेत आहोत. विद्यापीठात, वस्तीगृह, सामजिक संकल्प विभाग इत्यागी मागण्याचा निर्णय देखील घेण्यात येईल. मनातील सर्व इच्छा पूर्ण करणारे हे सरकार आहे. असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना आश्वासन दिलं.

पाहा व्हिडीओ -

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्ष साजरा करत आहोत, त्याचप्रमाणे मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करतोय. मराठवाड्याला संघर्षाची परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे घराणे मराठवाड्यातील आहे, त्यांनी आपल्याला प्रेरणा दिली तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी (Babasaheb Ambedkar) या ठिकाणी शिक्षणाचे रोपटे लावलं.

मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. उद्या हैदराबादला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या नेतृत्वात हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनाचा पहिल्यांदाच कार्यक्रम होत आहे. मी सुद्धा त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

तसंच आमचा अजेंडा सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचा आहे. आम्ही जो कार्यक्रम केला तो सोपा नव्हता, पण आपल्या आशिर्वादाने लढलो आणि जिंकलो. लोकांच्या मनातील निर्णय आम्ही घेतला आहे. मैं क्यों परवा करु जमाने के लोग मुझे क्या कहते हैं! मुझे सुकुन इस बात का है, आप सब लोग मुझे अपना कहते है! असा शायरीने मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ahilyanagar News: सीएनजी पंपावर कर्मचाऱ्यांची मुजोरी; वाहनात गॅस भरण्यावरून दाम्पत्याला मारहाण

Maharashtra Politics: महायुतीतील कुरघोडीमुळे शिंदे नाराज? शिंदे पुन्हा दिल्ली दरबारी

Bihar Election : निवडणुकीआधीच मुख्यमंत्र्यांची मोठी कारवाई; सत्ताधारी पक्षाने माजी मंत्र्यांसहित ११ आमदारांना केलं निलंबित

Eye Health: वारंवार डोळे चोळण्याची सवय आहे? तर वेळीच थांबवा, नाहीतर...

धनंजय मुंडेंना दणका! गोपीनाथ मुंडेंचे वारसदार कोण? पंकजा घेतली या दोन नेत्यांची नावे|VIDEO

SCROLL FOR NEXT