भाजपमध्ये जायच्या आधी देवाला विचारलं, जाऊ का? देव म्हणाला..., काँग्रेस नेत्याचं वक्तव्य; Video व्हायरल

माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यासह काँग्रेसच्या ८ आमदारांनी बुधवारी सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला.
Digambar Kamat Goa
Digambar Kamat GoaSaam TV

पणजी: देवाला विचारुन मी भाजमध्ये प्रवेश केला असल्याचं वक्तव्य गोव्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते दिगंबर कामत (Digambar Kamat) यांनी केलं आहे. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यासह काँग्रेसच्या (Congress) ८ आमदारांनी बुधवारी सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला.

या आठ आमदारांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केल्यानंतर दिगंबर कामत यांनी आपण भाजपामध्ये का गेलो याचं जे कारण सांगितलं आहे. ते मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले कामत माध्यमांशी बोलताना म्हणाले, मी भाजपमध्ये यायच्या आधी एका मंदिरात गेलो होतो. त्यावेळी मी देवाला काय करू? असं विचारलं असता देव म्हणाला, 'तुझ्यासाठी जे योग्य आहे ते कर काळजी करु नको' असं वक्तव्य कामत यांनी केलं आहे.

गोव्यात (Goa) काँग्रेसचे ११ आमदार आहेत. त्यापैकी ८ आमदार भाजपमध्ये आले आहेत. या आमदारांमध्ये माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यासह विरोधीपक्षाचे नेते माइकल लोबो यांचा देखील समावेशा आहे. त्यामुळे हा गोवा काँग्रेसला मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे. एकीकडे देशभरातील काँग्रेस मजबूत होण्यासाठी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी 'भारज जोडो' यात्रा काढली आहे. मात्र दुसरीकडे गोव्यात काँग्रेसलाच भगदाड पडल्याचं दिसतं आहेत.

पक्षाशी एकनिष्ठ राहण्याची घेतली होती शपथ -

महत्वाची बाब म्हणजे गोवा विधानसभा निवडणुकांपुर्वीच काँग्रेस नेत्यांनी मंदिर, मशिदी आणि चर्चमध्ये जाऊन काँग्रेस पार्टीसोबत एकनिष्ठ राहण्याच्या शपथा घेतल्या होत्या. मात्र, ७ महिने व्हायच्या आधीच काँग्रेसमधील ८ आमदारांनी आपल्या पक्षाला रामराम ठोकला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com