अत्‍याचार 
महाराष्ट्र

अल्‍पवयीन मुलीवर सतरा वर्षीय मुलाकडून अत्‍याचार

अल्‍पवयीन मुलीवर सतरा वर्षीय मुलाकडून अत्‍याचार

साम टिव्ही ब्युरो

साक्री (धुळे) : शहरातील नागपूर- सुरत महामार्गावरील (Nagpur Surat Highway) हाँटेल उदय पॅलेसमागे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलीला आपल्या घरी ठेवत शारीरिक संबंध ठेवले. याप्रकरणी मुलीच्या बाबांनी साक्री पोलिसात फिर्याद दिली. संबंधितांवर लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेणपूर (ता.साक्री) येथील आजोबांनी साक्री पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्‍यात म्हटले आहे, की त्यांच्या १४ वर्षीय अल्पवयीन नातीला १७ वर्षे ८ महिने वयाच्या साक्री येथे राहणाऱ्या मुलाने २४ ते २८ नोव्हेंबरदरम्यान त्याच्या घरी ठेवले. तसेच २६ नोव्हेंबरला त्याने त्यांच्या नातीशी शारीरिक संबंध ठेवल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या फिर्यादीची दखल घेत साक्री पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

मोबाईल लोकेशनवरून मुलीचा शोध

अंतापुर (ता. सटाणा) येथे मैत्रिणीकडे कार्यक्रम असल्याचे सांगून सदर मुलगी 24 नोव्‍हेंबरला घराबाहेर पडली होती. दुसऱ्या दिवशी मुलगी घरी परत न आल्याने आजोबांनी तिचा शोध सुरू केला. मात्र दोन वेळा मुलीचा स्वतः फोन येऊन गेल्यामुळे आजोबांना हायसे वाटायचे. मात्र 28 नोव्‍हेंबरला पुन्हा मुलीचा फोन बंद झाल्याने शोधाशोध केली असता मोबाईल लोकेशन आधारे मुलगी साक्री शहरात असल्याचे पोलिसांना आढळून आले. प्रत्यक्ष तपासाअंती मुलीला व संबंधित मुलाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. यातून घटनेचा उलगडा झाला.

बालकास ताब्‍यात घेत चौकशी

पोलिसांनी संबंधित विधिसंघर्ष बालकाला सोमवारी ताब्यात घेत चौकशी करत सोडून दिले. तसेच आजही त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलासह मुलीचीही वैद्यकीय तपासणी केली असून, त्याचा अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई करणार असल्याचे पोलिस उपनिरीक्षक पी. एम. बनसोडे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Aus: भारताच्या धारदार गोलंदाजीसमोर बॅटिंग ढासळली; सिरीजमध्ये टीम इंडिया आघाडीवर

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवसेना उबाठा गटाचे आंदोलन

Bihar Election: उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला घेराव; वाहनांवर दगड, शेणफेक, बूथ कॅप्चरिंगचा प्रयत्न, मतदानावेळी तुफान राडा

Indurikar Maharaj Daughter Engagement Photos: किर्तनकार इंदुरीकर महाराजांचा जावई कोण आहे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

WCD Recruitment: आनंदाची बातमी! महिला व बालविकास विभागात नोकरीची संधी; अर्ज कुठे अन् कसा करावा?

SCROLL FOR NEXT