कौतुकास्पद : RPF महिलां कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे महिलेची झाली सुखरूप प्रसूती ! प्रदीप भणगे
महाराष्ट्र

कौतुकास्पद : RPF महिलां कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे महिलेची झाली सुखरूप प्रसूती !

महिला कॉन्स्टेबल दुर्गेश आणि भावना यांनी महिलेला डोंबिवली स्थानकात उतरवले आणि रिक्षातून तातडीने डोंबिवलीच्या KDMC Hospital दाखल केले.

प्रदीप भणगे

डोंबिवली : आपल्या कामाप्रती कर्तव्यदक्ष राहणाऱ्या तसेच समाजिक संवेदनशीलता जपणाऱ्या मध्य रेल्वेच्या डोंबिवली Dombivli RPF कर्मचाऱ्यांनी एका गर्भवती महिलेला सोमवारी सकाळी 6.30 वाजता महिलेला रुग्णालयात घेऊन गेले आणि त्या महिलेची सुखरूप प्रसूती केली आहे.

संबधीत महिलेचे सना इफ्तियारअन्सारी असे नावं असून खडवली येथील अशोक नगरमध्ये त्या राहतात. सना या खडवलीहून मुंबईतील केईएम रुग्णालमध्ये (KEM Hospital) प्रसूतीसाठी जात होत्या. मात्र डोंबिवली स्थानकामध्ये पोहोचण्याआधीच त्यांना प्रसूती वेदना सुरू झाल्या. दरम्यान या वेळी तिथे उपस्थित अणाऱ्या RPF डोंबिवलीच्या महिला कर्मचाऱ्यांनी सना यांना सुरक्षितरीत्या रुग्णालयात दाखल केले. RPF महिलांनी कर्मचाऱ्यांनी आपल्याला जी मदत केली त्याबद्दल सना यांनी डोंबिवली आरपीएफचे आभार मानले आहेत.

दरम्यान डोंबिवली RPFचे वरिष्ठ PI हरफूल सिंग यादव यांनी आयजीआरला सांगितले की, आमच्या लेडी कॉन्स्टेबल भावना आणि ड्युटी वरती असताना. सकाळी 06.20 च्या सुमारास CSMT कडे जाणारी लोकल डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाट क्र. 3 वरती आल्यावर महिला डब्यातील एका महिलेला प्रसूती वेदना होत असल्याचे एका प्रवाशाने सांगितले. यानंतर महिला कॉन्स्टेबल दुर्गेश आणि भावना (Female constable Durgesh and Bhavna) यांनी त्या महिलेला डोंबिवली स्थानकात उतरवले आणि रिक्षातून तातडीने डोंबिवलीच्या केडीएमसी रुग्णालयात KDMC Hospital दाखल केले. तेथील डॉ. काजल शाह यांच्या देखरेखीखाली त्या महिलेने सुखरुपरित्या मुलाला जन्म दिला आहे. महिला आणि तिचे मुल दोघेही निरोगी आहेत. असल्याचे सांगितले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT