Beed News Saam TV
महाराष्ट्र

Beed News: सततच्या नापिकीने शेतकरी हवालदील; नैराश्यात राहत्या घरी केली आत्महत्या

रात्री त्यांनी घराच्या स्लॅबला असलेल्या हुकात रशी टाकून गळफास लावून घेतला.

साम टिव्ही ब्युरो

Beed News: बाजारात अन्नधान्याच्या किंमती गगणाला भिडल्या आहेत. मात्र तरी याचा योग्य मोबदला शेतकऱ्याला मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले आहे. बीड जिल्ह्यात सातत्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटना घडत आहेत. अशात काल देखील सततच्या नापिकीला कंटाळून ५६ वर्षीय एका शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेतला. नापीक आणि कर्जबाजारी झाल्याने त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. या घटनेने त्यांच्या कुटुंबीयांवर दुख:चा मोठा डोंगर कोसळला आहे. (Latets Marathi News)

प्राप्त माहितीनुसार, बीडच्या (Beed) चिंचोलीमाळी येथे ही घटना घडली आहे. यात सुभाष भागोजी राऊत असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. काल रात्री त्यांनी संपूर्ण कुटुंबाबरोबर जेवण केले. १२ नंतर सर्व झोपलेले असताना त्यांनी स्वत:चे जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. रात्री त्यांनी घराच्या स्लॅबला असलेल्या हुकात रशी टाकून गळफास लावून घेतला.

सकाळी त्यांच्या पत्नीला जाग आली तेव्हा पतीला पाहून त्यांना मोठा धक्का बसला. गावात ही घटना वाऱ्याच्या वेगाने पसरली. सुभाष राऊत यांच्याकडे फक्त २ एकर २५ गुंठे एवढी जमीन होती. यात पिकलेल्या धान्यातूनच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता. जमिनीत कोणतेही पीक हवे तसे येत नसल्याने त्यांच्या समोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. गावात उसने पैसे तसेच डोक्यावर मोठे कर्ज होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे. सदर घटनेत केज पोलीस (Police) स्टेशनमध्ये मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

SCROLL FOR NEXT