Radhakrishna Vikhe Patil, Shevgaon, Nagar saam tv
महाराष्ट्र

Radhakrishna Vikhe on AJit Pawar : अजितदादांच्या येण्याने सरकारच्या निर्णय क्षमतेला गती आली : राधाकृष्ण विखे पाटील

Political News : महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेली अधोगती भरून काढायची आहे.

साम टिव्ही ब्युरो

Shirdi News : अजित पवारांच्या  (Ajit Pawar)  सरकारमध्ये येण्याने सरकारच्या निर्णय क्षमतेला गती आली आहे, असं महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. सरकारचं काम अगदी उत्तम चाललं आहे. राज्याच्या भविष्याकरता आणि राज्याला स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी काम सुरु आहे, असंही त्यांनी म्हटलं.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेली अधोगती भरून काढायची आहे. जनतेच्या अपेक्षा निश्चित पूर्ण करू याचा विश्वास आम्हाला आहे, असंही राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.  (Maharashtra News)

दुबार पेरणीसाठी सरकार मदत करणार

राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy Rain) आणी पुरजन्य स्थिती आहे. काही जिल्हे अवर्षणग्रस्त आहेत. तर अनेक ठिकाणी पेरण्या वाया गेल्या आहेत. दुबार पेरणीसाठी सरकार मदत करणार असल्याचंही विखे पाटलांनी आश्वासन दिलं. दुबार पेरणीची गरज पडल्यास शेतकऱ्यांना सरकार बियाणे पुरवणार असल्याची राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.

सिन्नर टोलनाका तोडफोड प्रकरण

अमित ठाकरेंनी तोडफोड करण्याच्या सूचना दिल्या असतील असं वाटत नाही. राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संयम पाळण्याची गरज आहे. टोलनाक्यावर नियमानुसार काम सुरु होते. त्यांना माहित नसतं गाडीत कोण चाललंय. कार्यकर्त्यांनी अतिरेक थांबवायला हवा. कारण यातून त्यांच्याच पक्षाची बदनामी होते. पक्षनेतृत्वाने त्यांना समज देण्याची गरज आहे, असा सल्लाही राधाकृष्ण विखे पाटलांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पंढरपुरात स्वाभिमानी शेतकरी संघटना उस दरासाठी आक्रमक

दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात मोठी अपडेट; मास्टरमाईंडचे घर उडवले, सुरक्षा दलांची कारवाई

Bihar Election Result Live Updates: पोस्टल मतमोजणी संपली, सुरूवातीचे कल एनडीएच्या बाजूने

Accident News : नवले पुलाचा उतार ठरतोय मृत्यूचा सापळा, वर्षभरातील अपघाताचा आकडा धक्कादायक, घटनेला जबाबदार कोण?

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी टेन्शन वाढवणारी बातमी! 'या' जिल्ह्यातून २४ हजार महिला अपात्र; यादीत तुमचे नाव तर नाही ना?

SCROLL FOR NEXT