kOLHPAUR News
kOLHPAUR NewsSaam TV

Kolhapur Rain Update : कोल्हापूरकरांची चिंता वाढली; उद्या जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा, नागरिकांचं पंचगंगेवर लक्ष

Rain Update : पंचगंगा नदीची पातळी सध्या 38 फुटांवर आहे.
Published on

रणजीत माजगावकर

Kolhapur New : कोल्हापूरकरांचा चिंता वाढवणारी बातमी आहे. कोल्हापूर जिल्ह्याला आज हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला होता. त्यानुसार जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आज रेड अलर्ट आणि उद्याही जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यानंतर अनेक भागात पाणी साठण्याची शक्यता आहे.

पंचगंगा नदीची पातळी सध्या 38 फुटांवर आहे. तर पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट आहे तर धोका पातळी 43 फूट आहे. त्यामुळे उद्याही अतिमुसळधार पावसाच्या अंदाजामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. पंचगंगा नदी परिसरातील गावांना आधीच सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (Maharashtra News)

kOLHPAUR News
Irshalwadi Landslide Update: इर्शाळवाडी दरड दुर्घटनेचं बचावकार्य कायमचं थांबवलं; ५७ जण अद्यापही बेपत्ता

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 8 दिवसांपासून मुसळधार पाऊस  (Heavy Rain) आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 82 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. धरण क्षेत्रात अतिमुसळधार पावसाची नोंद झाली आहे. राधानगरी धरण 85 टक्के भरलं आहे.

kOLHPAUR News
Buldhana Heavy Rain : बुलढाण्याच्या तीन तालुक्यात अतिवृष्टी; एक लाख हेक्टर वरील पिकांचे नुकसान

कोल्हापुरातील 25 हून अधिक मार्ग बंद आहेत. कोकणात जाणारा कोल्हापूर-गगनबावडा मार्ग बंद आहे. तावडे हॉटेल परिसरातील नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांचे स्थलांतर करण्यात आलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील काही वर्षाच्या पूरपरिस्थिती अनुभव पाहता प्रशासनही सतर्क झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com