Irshalwadi Landslide Update: इर्शाळवाडी दरड दुर्घटनेचं बचावकार्य कायमचं थांबवलं; ५७ जण अद्यापही बेपत्ता

Irshalwadi Rescue Operation: घटनास्थळावर सतत पडणाऱ्या मुसळधार पाऊस आणि धुक्यांमुळे शोधकार्यात अडथळे येत होते.
Raigad Irshalwadi Landslide
Raigad Irshalwadi LandslideSAAM TV
Published On

Irshalwadi News: इर्शाळवाडी दरड दुर्घटनेतील (Irshalwadi Landslide) मृतांचा आकडा २७ वर पोहचला आहे. तर ५७ जण अद्याप बेपत्ता आहेत. चौथ्या दिवशी देखील बचावकार्य युद्धपातळीवर सुरु होते. पण आता हे बचावकार्य थांबवण्याचा निर्णय पालकमंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी घेतला आहे.

Raigad Irshalwadi Landslide
Gujarat Flood Video: गुजरातमध्ये 'जल प्रलय', संपूर्ण शहर गेलं पाण्याखाली, गाड्याही गेल्या वाहून; केंद्राने पाठवली मदत...

घटनास्थळावर सतत पडणारा मुसळधार पाऊस आणि धुक्यांमुळे शोधकार्यात अडथळे येत होते. अशामध्ये आता ढिगाऱ्याखाली दबलेले मृतदेह कुजण्यास सुरुवात झाली आहे. शोध कार्यामध्ये मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत. त्यामुळे शोधकार्य थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बेपत्ता दरडग्रस्तांना मृत घोषीत केले जाणार आहे.

Raigad Irshalwadi Landslide
Ambadas Danave On Cm Eknath Shinde: 'ज्यांच्या मांडीला मांडी नको म्हणून बाहेर पडले, तेच मांडीवर येऊ बसले'; अंबादास दानवेंचा CM शिंदेंना टोला

पालकमंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, इर्शाळवाडी येथील शोध मोहीम आजपासून थांबवण्यात आल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून जाहीर करण्यात आले. खालापूर पोलीस ठाण्यात त्यांनी सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषदेत घेत शोध मोहीम थांबण्यात आले असल्याचे जाहीर केले.

Raigad Irshalwadi Landslide
Pune PMPML Employee News : पीएमपीएमएलच्या ३६ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई, काय आहे कारण?

उदय सामंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, '२७ मृतदेह सापडले आहेत. ५७ जण बेपत्ता आहेत त्यांना मृत घोषीत करण्यात आले. यांना मृत घोषीत करून आजपासून एनडीआरएफचे सर्च ऑपरेशन थांबवण्यात आले आहे. या दुर्घटनेमध्ये बचावलेल्या 144 लोकांचे लवकरात लवकर पुनर्वसन केले जाईल. त्यांना सिडकोमध्ये घरं देता येतील का? याबाबत मुख्यमंत्री निर्णय नक्की घेतील. दरडग्रस्तांची अवहेलना होणार नाही.'

Raigad Irshalwadi Landslide
B Subhash Daughter Died : सुप्रसिद्ध दिग्दर्शक बी सुभाष यांच्यावर कोसळला दुखःचा डोंगर; मुलीचे गंभीर आजाराने निधन

दरम्यान, खालापूरनजीकच्या इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडीवर बुधवारी रात्री १०.३० वाजता दरड कोसळली. या दुर्घटनेत संपूर्ण इर्शाळवाडी गावच गायब झाले. या गावामध्ये ४७ घरं होती. तर २२८ जण याठिकाणी राहत होते. या दुर्घटनेमध्ये फक्त चार ते पाच घरातील लोकं बचावले. बाकी सर्वजण ढिगाऱ्याखाली अडकले गेले. ही घटना घडल्यापासून घटनास्थळावर स्थानिक प्रशासन, अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या जवानांकडून बचावकार्य सुरु होते. ते अखेर आज थांबवण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com