B Subhash Daughter Died : सुप्रसिद्ध दिग्दर्शक बी सुभाष यांच्यावर कोसळला दुखःचा डोंगर; मुलीचे गंभीर आजाराने निधन

Shweta Babbar Passed Away : दिग्दर्शक, निर्माता आणि लेखक बी सुभाष यांची मुलगी श्वेता बब्बरचे निधन झाले आहे.
Shweta Babbar Passed Away
Shweta Babbar Passed AwaySaam TV
Published On

Disco Dancer Fame Director Daughter Died At 48 : बॉलिवूडचे सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि लेखक बी सुभाष यांची मुलगी श्वेता बब्बरचे निधन झाले आहे. मीडिया अहवालानुसार, श्वेताचा मृत्यू शनिवारी म्हणजेच 22 जुलै रोजी झाला. गेल्या वर्षी बी सुभाष यांची पत्नी त्यांना सोडून गेली. आता त्यांची मुलगी त्यांच्यापासून दूर गेली आहे.

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

श्वेता बब्बर यांनी शनिवारी रात्री एक वाजताच्या सुमारास मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. 19 जुलै रोजी श्वेता घरात पडल्याचे सांगितले जात आहे.

त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात श्वेताच्या पाठीच्या कण्यामध्ये क्लॉटिंग झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. डॉक्टरांनी सांगितले की, श्वेताला अशा ठिकाणी क्लॉटिंग झाले आहे, ज्यामुळे शरीराच्या इतर भागांमध्ये रक्तपुरवठा होत नाही.

Shweta Babbar Passed Away
Bigg Boss OTT 2 : मनीषा रानीला टार्गेट केलं जातंय ? 'वीकेंड का वार'नंतर सलमान खानल ट्रोलर्सच्या निशाण्यावर

श्वेता घरात पडली होती

रुग्णालयात तीन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर श्वेताने अखेर या जगाचा निरोप घेतला. तिचे वय अवघे ४८ वर्षे होते. पत्नीनंतर आता बी सुभाष मुलीच्या मृत्यूने तुटले आहेत.

निर्मात्याची पत्नी तिलोत्तिम्मा (67) यांचे गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये निधन झाले. त्या अनेक वर्षांपासून गंभीर आजारांशी झुंज देत होत्या. बी सुभाष यांनी सांगितले की, पत्नीच्या किडनीच्या आजाराची माहिती मिळताच त्यांनी किडनी दान करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु डॉक्टरांनी काही चाचण्या केल्या आणि असे आढळून आले की तिला फुफ्फुसाचा त्रास आहे, त्यामुळे किडनी प्रत्यारोपण करता आले नाही, कारण त्याचा तिच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

Shweta Babbar Passed Away
Madhurani Gokhale On Politics : मधुराणी राजकरणात करणार प्रवेश? मुलाखतीदरम्यान अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली...

सलमान खानने मदत केली

बी सुभाष (७९) यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. त्यांनी बॉलिवूडमध्ये 18 हून अधिक चित्रपटांची निर्मिती केली आहे. एक काळ असा होता जेव्हा त्यांनी पत्नीच्या उपचारासाठी बॉलिवूडमध्ये मदत मागितली होती. त्यानंतर सलमान खान आणि मिथुन चक्रवर्ती यांनी त्यांना मदत केली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com