Madhurani Wanted To Work For Women Empowerment : 'आई कुठे काय करते' ही मालिका महाराष्ट्रातील प्रेक्षकांची लाडकी मालिका आहे. या मालिकेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. या मालिकेतील अरुंधती म्हणजे मधुराणी गोखले प्रभुलकर सध्या तिच्या घटस्फोट अफवांमुळे चर्चेत होती. तिच्या नवऱ्याने या अफवा खोडून काढल्या आहेत.
मधुराणीने नुकत्याच एका यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत तिने अनेक गोष्टींचा उलगडला आहे. मधुराणीने सांगितलं की, घरात एकतरी कलाकार असायला हवा. सुंदर माझं घर या चित्रपटाचं मधुराणीने संगीत दिग्दर्शन केलं आहे. (Latest Entertainment News)
चित्रपटासाठी मी कविता किंवा गाणी लिहिण्यापेक्षा गाण्यांना चाली देईन, असे मधुराणीने या मुलाखतीत सांगितलं आहे. स्त्रीवादी भूमिका आणि स्त्रीयावर मधुराने तिचे मत देखील व्यक्त केली. तिने अनेक पुस्तके वाचली आहेत. याचा मधुराणीला अरुंधती हे पात्र साकारण्यात मदत झाली असल्याचे तिने सांगितले.
या सगळ्या प्रश्नाच्या मालिकेत मधुराणी राजकारणात येईल का? असे विचारण्यात आले. यावर उत्तर मधुराणी देत म्हणाली की, 'नाही, अजिबात नाही. मी यासगळ्यापासून लांबच राहते. मी इव्हेंट करतच नाही.
मालिका एवढी प्रसिद्ध झाल्यानंतर दार आठवायला मला एका इव्हेंटसाठी फोन येतो. अमुक इव्हेंट आहे, उद्धघाटन आहे, हळदी-कुंकू आहे, मी जाणीवपूर्व यासगळ्यापासून दूर राहते. खुप पैसे मिळतात या सगळ्यात.
इतके की तीन वर्षात मी घर बंधू शकते मुंबईत. पण मला असं वाटत की मी अभिनय करायला आले आहे. त्याच्यावरचा माझा फोकस हलता कामा नये. त्यामुळे मी इव्हेंट नाही करत. लगेच मिळणाऱ्या पैश्याच्या मागे जात नाही. कारण त्याच्यात अनेकदा राजकारण समाविष्ट असत.
माझ्यापर्यंत कोणतेही पक्ष अजूनपर्यंत आलेले नाहीयेत. येतील असं वाटत नाही. तो एक वेगळा पिंड आहे. कलाकार म्हणून मरेन राजकारणी नाही होणार. मी ग्राउंड लेव्हल काम कारेन पण निवडणूक नाही लढणार. जर महिला सक्षमीकरणासाठी काम कार्याचे असेल तर ते मी माझ्या माध्यमातून करेन. त्याच्या राजकारणाशी काहीही संबंध नसेल. आणि ते मी नक्की कारेन.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.