Pune PMPML Employee News : पीएमपीएमएलच्या ३६ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई, काय आहे कारण?

PMPML News : निलंबित कर्मचाऱ्यांमध्ये ३० कंडक्टर आणि ६ चालकांचा समावेश आहे.
Pune News
Pune News Saam TV
Published On

Pune News : पुणेकरांचा लाईफलाईन समजली जाणाऱ्या पीएमपीएमएलच्या काही कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली आहे. पीएमपीएमएलच्या ३६ कर्मचाऱ्यांचं प्रशासनाने निलंबन केलं आहे.

पुण्यातील १५ डेपोंमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी ३६ कर्मचाऱ्यांचे रेकॉर्ड खराब असल्याचं निदर्शनास आले आहे. त्यामुळे या ३६ कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. निलंबित कर्मचाऱ्यांमध्ये ३० कंडक्टर आणि ६ चालकांचा समावेश आहे. (Pune News)

Pune News
Pune Dam Water Level Today: पुणेकरांचा पाणीप्रश्न सुटणार?; वाचा धरणातील सध्याचा पाणीसाठा किती?

या सोबतच कोणतीही पूर्वसूचना न देता २२ जुलैपासून गैरहजर राहिलेल्या एकूण १४२ कर्मचाऱ्यांना नोटीस देण्यात आली आहे. यामध्ये यामध्ये ७८ कंडक्टर व ६४ चालकांचा समावेश आहे.  (Latest Marathi News)

Pune News
Mumbai Dam Water Level Today: मुंबईकरांचा पाणीप्रश्न सुटणार? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या किती पाणीसाठा?

प्रवाशांची गैरसोय होऊ नये व त्यांना सौजन्यपूर्ण सेवा मिळावी या हेतूने कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पीएमपीएमएल कडून सांगण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com