Pune Dam Water Level Today: पुणेकरांचा पाणीप्रश्न सुटणार?; वाचा धरणातील सध्याचा पाणीसाठा किती?

Pune Dam Water Level: पुण्यातील संपूर्ण शहराची तहान भागवणाऱ्या धरणांमध्ये आतापर्यंत हवा तसा पाणीसाठा झालेला नाही.
Pune Dam Water Level Today
Pune Dam Water Level TodaySaam TV
Published On

अक्षय बादवे

Pune Dam News: राज्यात सध्या सर्वत्र मुसळधार पावसाच्या सरी बरसताना दिसतायत. पुण्यातही गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावलीये. पावसामुळे धरणातील पाणीसाठा वाढताना दिसतोय. पुण्यातील संपूर्ण शहराची तहान भागवणाऱ्या धरणांमध्ये आतापर्यंत हवा तसा पाणीसाठा झालेला नाही. त्यामुळे पुणेकर अद्यापही पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. (Latest Marathi News)

पुणे (Pune) जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये (Dam) एकूण ५२ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पुणेकरांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. खडकवासला धरण ६४ टक्के भरले असून मागील वर्षी आजच्या दिवशी ९५ टक्के इतका पाणीसाठा होता.

Pune Dam Water Level Today
Mumbai Dam Water Level Today: मुंबईकरांचा पाणीप्रश्न सुटणार? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या किती पाणीसाठा?

संततधार पावसामुळे धरणसाठ्यात चांगली वाढ झाली असली तरी सुद्धा मोठ्या पावसाची अपेक्षा पुणेकर करत आहेत. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर ही धरणे येतात.

पुणे विभागातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठी

खडकवासला: 64.10 टक्के

पानशेत: 55.63 टक्के

वरसगाव: 51.94 टक्के

टेमघर: 35.31 टक्के

Pune Dam Water Level Today
Bus Stuck in Flood Water: प्रवाशांनी खचाखच भरलेली बस पुराच्या पाण्यात अडकली; थरकाप उडवणाऱ्या घटनेचा LIVE VIDEO

मुंबईतील पाणीसाठा किती?

मुंबईला (Mumbai) पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये ४८ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे मुंबईला दररोज होणारा पाणीसाठा पाहता हे पाणी जानेवारीपर्यंत पुरण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मुंबईतील पाण्याची सध्याची स्थिती?

अप्पर वैतरणा -43 हजार 657 दशलक्ष लिटर (19.20 टक्के)

मोडक सागर - 96 हजार 919 दशलक्ष लिटर (75.17 टक्के)

तानसा - 1 लाख 25 हजार 717 दशलक्ष लिटर (86.66 टक्के)

मध्य वैतरणा - 10 लाख 8 हजार 816 दशलक्ष लिटर (56.23 टक्के)

भातसा - 28 लाख 3 हजार 984 दशलक्ष लिटर (39.61 टक्के)

विहार - 21 हजार 2 दशलक्ष लिटर (75.82 टक्के)

तुळशी - 8 हजार 46 दशलक्ष लिटर (100 टक्के)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com