देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस  SaamTvNews
महाराष्ट्र

Drugs Case मध्ये राष्ट्रवादीशी संबंधित व्यक्तीचा समावेश!

संजय डाफ साम टीव्ही नागपूर

नागपूर : मुंबईतील कॉर्डेलिया क्रूझ पार्टी प्रकरणात मंत्री नवाब मलिक सातत्याने नवनवे खुलासे करत असून याच प्रकरणी त्यांनी भाजपलाही टार्गेट केलं आहे. एनसीबीने सोडलेल्या लोकांमध्ये भाजपशी संबंधित लोक असल्याचा नवा खुलासा त्यांनी आज केला. त्यांच्या या आरोपाला प्रत्युत्तर देताना विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, एनसीबीने (NCB) छापेमारीनंतर ज्या लोकांना सोडून दिलं , त्यामध्ये राष्ट्रवादीशी संबंधीत एका व्यक्तीचा समावेश होता, असा दावा त्यांनी केला आहे.

यावेळी फडणवीस म्हणाले कि, NCB ने अगोदरच सांगितले होते की त्यांनी अनेक लोकांना पकडले होते, त्याच्यातील जे क्लीन होते त्यांना त्यांनी सोडलं आहे. ज्यांच्याकडे काही सापडलं, ज्यांच्या फोन मध्ये काही पुरावे सापडले, chats सापडल्या, त्यांना पकडले आहे.

हे देखील पहा :

ड्रग्ज हि समाजाला लागलेली कीड :

ड्रग ही समाजाला लागलेली कीड असून याचा बिमोड करण्यासाठी जर कोणती एजन्सी काम करत असेल तर तिच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. हा कोणत्या पक्षाचा प्रश्न नाही, हा समाजाचा आणि तरुणाईचा प्रश्न आहे. याचे राजकारण केले जात आहे. ज्यांना सोडलं त्यामध्ये NCP च्या वरिष्ठ नेत्याच्या मुलाचा एक जवळचा माणूस होता . त्याचं नाव आम्ही घेत नाही कारण की तो क्लीन होता. तो क्लीन असल्यामुळे त्याचं नाव घेऊन त्याला बदनाम करणे अयोग्य आहे.

आयकर विभागाच्या धाडी पवार कुटुंबीयांविरोधात नाहीत :

यावेळी फडणवीस म्हणाले, आयकर विभागाने ज्या धाडी टाकल्या आहेत, त्या दोन प्रकारच्या आहेत. पहिल्या दिवशी झालेल्या कारवाई बद्दल आयकर विभागाने 1050 कोटी रुपयांच्या दलाली चे पुरावे सापडल्याचे सांगितले आहे, हे अत्यंत गंभीर आहे. माध्यमांनाही त्याच गांभीर्य अजून कळलेलं नाही. ही 1050 कोटींची दलाली बदल्यांसाठीची आहे टेंडर साठीची आहे, असे देशात पहिल्यांदाच होत आहे.

काल ज्या पाच साखर कारखान्यांवर धाडी टाकण्यात आल्या त्या कारखान्याच्या खरेदीसाठी राबवण्यात आलेली प्रक्रिया चूक असल्यामुळे ही कारवाई झाली. साखर कारखाना खरेदी करताना तुम्ही तो लाचेच्या किंवा काळ्या पैशाने त्याबद्दल फक्त टॅक्स भरून तो पांढरा पैसा आहे असं भासवून खरेदी करू शकत नाही. कारखाना खरेदी करताना तो योग्य पैशानेच खरेदी करावा लागतो. मात्र, या पाचही प्रकरणात तसं झालं नव्हतं, त्या अनुषंगाने आयकर विवाहागला तक्रारी होत्या आणि त्यानंतरच आयकर विभागाने कारवाई केली आहे.

पवार कुटुंबामध्ये इतर अनेक लोक आहेत, ते त्यांचे व्यवसाय करत आहेत, त्यांच्याविरोधात कारवाई झालेली नाही. त्यामुळे आयकर विभागाच्या कारवाई पवार कुटुंबीयांच्या विरोधात आहे असे म्हणणे चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasant More Election symbol : झोप उडवणार! वसंत मोरेंना निवडणूक चिन्ह मिळताच विरोधकांना दिला थेट इशारा

Pankaja Munde: 'मराठा आरक्षणासाठी पाठिंबा द्या', बीडमध्ये पंकजा मुंडेंसमोर आंदोलकांची घोषणाबाजी; VIDEO

Mumbai University Exams | मुंबई विद्यापीठ, परीक्षेच्या वेळापत्रकात बदल!

Devendra Fadnavis On Opposition | देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांना इशारा

Shantigiri Maharaj | नाशिकमधून उमेदवारी अर्ज भरल्यानं दिवसभर चर्चा, शांतीगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?, Exclusive Video

SCROLL FOR NEXT