Nandurbar News  saam tv
महाराष्ट्र

Drunk Driving Cases : दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांनाे सावधान ! वाचा एसपींचा आदेश

Drunk driving : पाेलिसांनी माेहिम हाती घेतली असून यामुळे बेशिस्त वाहनधारकांमध्ये खळबळ उडाली आहे.

Siddharth Latkar

- सागर निकवाडे

Nandurbar News : दारू पिऊन वाहन चालवणे आणि बेशिस्त वाहन चालवण्याऱ्यांचा परवाने रद्द केले जात आहेत. याबाबतची माहिती नंदूरबारचे जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी दिली. यामुळे बेशिस्त वाहन चालविणा-यांना आळा बसेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. (Maharashtra News)

नंदुरबार (nandurbar) शहरात आणि ग्रामीण भागात रात्रीच्या वेळेस अनेक जण दारू पिऊन तसेच बेशिस्त वाहन चालवतात. त्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण अधिक वाढलं आहे. यावर कडक कारवाई करण्यासाठी नंदुरबार पोलीस दलाने हालचाली सुरु केल्या आहेत.

पाेलिसांकडून रात्री दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर तसेच बेशिस्त वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. विशेष म्हणजे रात्री दारू पिऊन वाहन चालवताना आढळल्यास व बेशिस्त वाहन धारकाचे परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव आरटीओला पाठविला जात आहे.

जिल्हा पोलीस (police) अधीक्षक पी. आर. पाटील म्हणाले जानेवारी ते जून महिन्यापर्यंत दहा परवाने रद्द करण्यात आले आहेत तर आणखीन काही परवाने आरटीओ विभागाकडे पाठवण्यात आलेले आहेत. या वाहनधारकांकडून दंडात्मक वसुली देखील करण्यात आलेली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : शिंदे गटाला झटका, महिला नेत्याचा अजित पवार गटात जाण्याचा निर्णय

पश्चिम महाराष्ट्रात शिंदेंना भाजपचा धक्का, आमदाराच्या भावासह ४० पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र!

Body changes after death: मृत्यूनंतर व्यक्तीचं तोंड अनेकदा का उघडं राहतं?

Arjun Tendulkar : सचिनच्या पावलावर चालत अर्जुनने केला साखरपुडा; वयाचं गुपित ऐकून चाहत्यांमध्ये रंगली चर्चा

Maharashtra Live News Update: रायगडच्या पायथ्याशी जोरदार पाऊस

SCROLL FOR NEXT