draupadi bitkar, amravati news saam tv
महाराष्ट्र

Dharni News : विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू

या घटनेमुळे कुटुंबाला माेठा धक्का बसला आहे.

Siddharth Latkar

- अमर घटारे

Melghat News : विद्युत प्रवाहाचा धक्का लागल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना अमरावती (amravati) जिल्ह्यात घडल्याचे समाेर आले आहे. या घटनेमुळे महिलेच्या (women) कुटुंबियांना माेठा धक्का बसला आहे. (Breaking Marathi News)

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरातील धारणी येथे ही दुर्देवी घटना घडली आहे. या घटनेबद्दल मिळालेली प्राथमिक अशी - द्रोपती बेटेकर या त्यांच्या घरात पाण्याची मोटर लावत हाेत्या.

ही माेटर लावत असताना त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. त्यानंतर त्यांच्या कुुटुंबियांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्यांना तपासल्यानंतर मृत घोषित केले आहे. द्रोपती या आशा पर्यवेक्षिका होत्या. दरम्यान अलीकडच्या काळात विजेचा धक्का बसल्याने मृत्यू झालेली ही अमरावती जिल्ह्यातील दुसरी घटना आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balushahi Recipe: सणासुदीला झटपट बनवा खुसखुशीत आणि पाकात मुरलेली बालूशाही, वाचा रेसिपी

Tomatoes for heart health: हृदयाच्या आरोग्यासाठी टोमॅटो फायदेशीर; पण कच्चा खावा की शिजवून? कार्डिओलॉजिस्टने दिलं उत्तर

Pitru Paksha 2026: श्राद्ध कसं करायचं? पितृ पक्षात कोणते विधी केले जातात? वाचा...

Maharashtra News Live Update: साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण, चौकशी समितीने आणखी 8 आठवड्यांची मुदत मागितली

मनोज जरांगेंना मोठा झटका! निकटवर्तीयावर ४.९० कोटींचा दंड कायम

SCROLL FOR NEXT