Balushahi Recipe: सणासुदीला झटपट बनवा खुसखुशीत आणि पाकात मुरलेली बालूशाही, वाचा रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य तयार करा

मैदा, तूप, दही, बेकिंग सोडा, पाणी, तळण्यासाठी तेल किंवा तूप आणि साखरेचा पाक तयार करण्यासाठी साखर व पाणी घ्या. सजावटीसाठी पिस्ता किंवा बदाम वापरू शकता.

Balushahi Recipe | Google

बालूशाहीचे पीठ मळा

एका भांड्यात मैदा आणि थोडे बेकिंग सोडा घ्या. त्यात तूप आणि दही घालून हलक्या हाताने मिश्रण एकत्र करा. आवश्यकतेनुसार थोडे पाणी घालून सैलसर पीठ तयार करा.

Balushahi Recipe | Saam Tv

पीठाला विश्रांती द्या

मळलेले पीठ जास्त घट्ट करू नका. पीठ झाकून साधारण १५ ते २० मिनिटे ठेवून द्या. यामुळे बालूशाहीचा पोत चांगला येण्यास मदत होते.

Balushahi Recipe | Saam Tv

बालूशाहीला आकार द्या

पीठाचे समान आकाराचे छोटे गोळे करा. प्रत्येक गोळ्याला हलकेच चपटा करून मधोमध अंगठ्याने छोटासा खळगा तयार करा. यामुळे बालूशाहीला पारंपरिक आकार मिळतो.

Balushahi Recipe | Saam tv

मंद आचेवर तळा

कढईत तेल किंवा तूप गरम करा. बालूशाही थेट खूप गरम तेलात न टाकता मंद किंवा मध्यम आचेवर हळूहळू तळा. ती बाहेरून सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.

साखरेचा पाक तयार करा

एका भांड्यात साखर आणि पाणी घेऊन पाक तयार करा. पाकाला साधारण एकतारी किंवा किंचित चिकटसर पोत येऊ द्या. त्यात वेलची पूड घातल्यास सुगंध वाढतो.

Balushahi Recipe | Saam Tv

पाकात बालूशाही मुरवा

तळलेल्या बालूशाही थोड्या कोमट झाल्यावर साखरेच्या पाकात बुडवा. काही मिनिटे पाकात ठेवल्यानंतर बाहेर काढा आणि वरून पिस्ता किंवा बदाम घालून सजवा.

Balushahi | yandex

Kito Diet: कीटो डाइट सुरू केल्यावर शरीरात काय होतं? फॅट बर्निंगपासून ब्लड शुगरपर्यंत जाणून घ्या ‘हे’ बदल

Kito Diet | Saam Tv
येथे क्लिक करा