Women's Hospital Amravati : 11 महिन्यात 'या' कारणामुळे NICU विभागातील 176 बालके दगावली; अमरावतीकर संतप्त

या बालकांवर या ठिकाणी उपचार करणे कठीण होत आहे.
Amravati, womens hospital amravati
Amravati, womens hospital amravatisaam tv
Published On

- अमर घटारे

Amravati News : अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील (amravati women's hospital) एनआयसीयु विभागात (neonatal intensive care unit) मागील 11 महिन्यात 176 तसेच याच विभागातून इतर रुग्णालयात रेफर केलेल्या 31 असे 207 नवजात शिशुंचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याची विविध कारण असली तर रुग्णालयातील एनआयसीयु वार्डमध्ये व्हेंटिलेटरची (ventilator) गरज आहे. (Maharashtra News)

Amravati, womens hospital amravati
Kanda Anudan News : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; अनुदानासाठी 'या' तारखेपर्यंत अर्ज करता येणार

अनेक बालके कमी दिवसाची असतात कमी वजनाचे असतात. त्यांना श्वास घ्यायला त्रास हाेताे. हॉस्पिटलमध्ये 26 सप्टेंबरला एनआयसीयु वार्डामध्ये व्हेंटिलेटरचा स्फोट झाला. तेव्हापासून या वार्डमध्ये आरोग्य विभागाने व्हेंटिलेटर वापरण्यास बंदी घातली होती.

Amravati, womens hospital amravati
Nitin Gadkari's Panvel Speech: खरोखर मी थकलाेय आता, इजा...बिजा.. आता तिजा असं का म्हणाले नितीन गडकरी (पाहा व्हिडिओ)

तेव्हापासून वार्डमध्ये व्हेंटिलेटर नाही. त्यामुळे अनेक बालके इतर रुग्णालयात रेफर करावी लागत आहे. यामध्ये बहुतांश बालके ही मेळघाट मधील आहे. व्हेंटिलेटर नसल्यामुळे ज्या बालकांना श्वास घेण्यासाठी त्रास होतो त्यांना हृदयाचा त्रास असताे. या बालकांवर या ठिकाणी उपचार करणे कठीण होत आहे. त्यामुळे प्रशासनाने याची दखल घ्यावी अशी सर्वसामान्यांची मागणी आहे.

चार व्हेंटिलेंटरची गरज

आमच्याकडे पाच सी प्याप मशीन असल्याचा डाॅक्टरांनी सांगितले. सध्या रुग्णालयात एकच व्हेंटिलेटर असून आता चार व्हेंटिलेंटरची मागणी केली असल्याची माहिती जिल्हास्तरीय रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.विनोद पवार यांनी दिली.

Amravati, womens hospital amravati
Kanda Anudan News : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; अनुदानासाठी 'या' तारखेपर्यंत अर्ज करता येणार

बालकांच्या मृत्यूस सरकार जबाबदार

दरम्यान बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे अमरावती महानगर प्रमुख बंटी रामटेके यांनी थेट सरकारवरच प्रश्न उपस्थित केला आहे. 176 बालकांचा मृत्यू कसा होऊ शकतो यात आरोग्य यंत्रणेचे अपयश नाही का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. याबाबत त्यांनी निषेध करत आंदोलनाचा देखील इशारा दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com