Solapur Dr Shirish Valsangkar death case Manisha Mahesh Musale Saam Tv News
महाराष्ट्र

Dr. Shirish Valsangkar: डॉ. वळसंगकर प्रकरणाला नवं वळण, मुलगा - सुनेच्या जबाबातून सगळी माहिती उघड; हॉस्पिटलच्या कारभारावरून वाद अन्..

New Revelations in Dr. Shirish Valsangkars Case: सोलापुरातील नामवंत न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणात नवनवीन खुलासे समोर येत आहेत. अशातच मुलगा डॉ. आश्विन आणि सून डॉ. सोनाली यांचा जबाब नोंदवण्यात आले आहे.

Bhagyashree Kamble

सोलापुरातील नामवंत न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणात अनेक बाबी समोर येत आहेत. आरोपी मनीषा माने हिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे. आता वळसंगकर यांच्या मुलाचा आणि सुनेचा पोलिसांनी जबाब नोंदवला आहे. तसेच आरोपी मनीषा मुसळे-मानेची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. शिरीष वळसंगकर यांनी काही वर्षांपूर्वी आपल्या हॉस्पिटलची पूर्ण सूत्र मुलगा डॉ. आश्विन आणि सून सोनाली यांच्याकडे सोपवली होती. तर हॉस्पिटलमधील संपूर्ण कारभार ह्या प्रशासकीय अधिकारी म्हणून आरोपी मनीषा मुसळे-माने या बघत असल्याची माहिती समोर आली आहे.

हॉस्पिटलमधील रुग्णांचे उपचार आणि प्रशासकीय कारभार यामुळे डॉ.आश्विन आणि डॉ. सोनाली यांच्यावर मोठ्या प्रमाणावर ताण वाढलेला होता. त्यामुळे २०२५ साली डॉ. शिरीष वळसंगकर यांनी पुन्हा एकदा हॉस्पिटलची सूत्र स्वतःकडे घेतली. तेव्हा प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे-माने हिच्या विरोधात काही आर्थिक गैरव्यवहारच्या तक्रारी डॉ. वळसंगकर यांच्याकडे आल्या होत्या. डॉ. वळसंगकर यांनी मनीषा मुसळे-माने हिचे अधिकार कमी केले होते.

याच कारणामुळे मनीषा मुसळे-माने हिने डॉ. वळसंगकर यांच्याशी वाद घातला. शिवाय इमेल लिहीत स्वतः आत्महत्या करण्याची धमकी देखील दिली. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवाय काही महिन्यांपूर्वी डॉ. वळसंगकर यांच्या कुटुंबियात संपत्तीच्या शेअर्सबद्दल देखील चर्चा झाली होती. त्यानुसार डॉ. शिरीष वळसंगकर यांनी काही महिण्यापुर्वीच संपत्तीचे वाटणी कशी असावी याबाबत सविस्तर शपथपत्र देखील तयार केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : पिकांच्या संरक्षणासाठी तारेत सोडला विद्युत प्रवाह; चारा कापताना झाला घात, विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

Aamhi Saare Khavayye : खुशखबर! मराठी कुकिंग शो 'आम्ही सारे खवय्ये' येतोय? पाहा VIDEO

Rave Party: रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

SCROLL FOR NEXT