Dr Babasaheb Ambedkar Marathwada University Saam tv
महाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपकुल सचिवाचा आत्महत्येचा प्रयत्न; चिठ्ठीत २ बड्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

Chhatrapati sambhaji nagar News : मराठवाडा विद्यापीठाच्या उपकुल सचिवाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. चिठ्ठीत २ बड्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केलाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपकुल सचिवाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. आत्महत्येचा प्रयत्न करण्याआआधी चिठ्ठी देखील लिहिली. उपकुल सचिवाच्या आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या घटनेने संपूर्ण शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

हेमलता ठाकरे असं या विद्यापीठाच्या उपकुल सचिवांचं नाव आहे. हेमलता ठाकरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर बेशुद्ध झाल्या. त्यानंतर बेशुद्धावस्थेत त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल केले. ठाकरे यांनी आत्महत्या करण्याआधी चिठ्ठी लिहिली. या चिठ्ठीत दोन मोठ्या अधिकाऱ्यांचे नावे आहेत. कुलगुरू विजय फुलारी, कुलसचिव प्रशांत अमृतकर यांच्यावर गंभीर आरोप केले.

अधिकाऱ्यांवर छळाचा आरोप

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील उपकुलसचिव हेमलता ठाकरे यांनी मोठ्या प्रमाणात झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ठाकरे यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हेमलता ठाकरे यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत विद्यापीठाचे कुलगुरू विजय फुलारी, कुलसचिव प्रशांत अमृतकर यांनी छळ केल्याचा आरोप केला आहे. विविध कारणाने नोटीस काढून त्यांना छळले असा आरोप ठाकरे यांनी केला आहे. हेमलता ठाकरे यांच्या आत्महत्येच्या प्रयत्नामुळे विद्यापीठात एकच खळबळ उडाली आहे.

महिना भरापूर्वी ठाकरे यांनी आपल्याला कर्मचारी देत नसल्याने डोक्यावर फाइल्स घेऊन दुसऱ्या विभागात बदलीच्या ठिकाणी रुजू झाल्या होत्या. त्यामुळे हेमलता ठाकरे चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर आता त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. आत्महत्येच्या प्रयत्नाआधी लिहिलेल्या चिठ्ठीत कुलगुरु आणि कुलसचिव त्रास देत असल्याचे म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apple Cider Vinegar: त्वचेवर अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर लावल्याने कोणते परिणाम होतात?

IAS Transfers List : राज्यात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची मालिका सुरुच; कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

Russia-Ukraine Tension: रशिया युक्रेन युद्ध पुन्हा सुरु, रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला

Mumbai Dadar Fire: दादर रेल्वे स्टेशनच्या पार्किंगमधील वाहनांना आग; 12 वाहने जळून खाक

Ganesh Mandap: गणेश मंडपात पुजाऱ्यासोबत चमत्कार? बेशुद्ध पडलेला पुजारी थेट उठून बसला?

SCROLL FOR NEXT