Maratha Tractor Rally Saam Tv
महाराष्ट्र

Maratha Tractor Rally: 'मराठा नेत्यांना ट्रॅक्टर देऊ नका', पोलिसांची 400 जणांना नोटीस; आंदोलकांनी व्यक्त केला संताप

Maratha Reservation Updates in Marathi: बीडमध्ये 23 डिसेंबर रोजी मनोज जरांगे पाटील यांची जाहीर निर्णायक इशारा सभा होणार नोहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून जवळपास 400 जणांना नोटीस पाठवण्यात आल्या असल्याचं सांगत मराठा समन्वयकांनी संताप व्यक्त केलाय.

साम टिव्ही ब्युरो

Maratha Reservation Updates in Marathi:

बीडमध्ये 23 डिसेंबर रोजी मनोज जरांगे पाटील यांची जाहीर निर्णायक इशारा सभा होणार नोहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून जवळपास 400 जणांना नोटीस पाठवण्यात आल्या असल्याचं सांगत मराठा समन्वयकांनी संताप व्यक्त केलाय.

सरकार नोटीस आडून मराठा आंदोलकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. असा आरोप करत मराठा समाज आता थांबणार नाही. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत माघार नाही, असा निर्धार मराठा बांधवांनी बोलून दाखवलाय. तर सभा शांततेत पार पाडण्यासाठी या नोटीस बजावल्या असल्याचं पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सांगितलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, बीडमधील सभा ही जंगी होणार आहे. याची जोरदार तयारी सुरू आहे. या सभेसाठी भव्य मैदान केलं असून याची साफसफाई पूर्ण झाली आहे. या ठिकाणी आता स्टेज उभारणीचे कामही पूर्णत्वाकडे असून येणाऱ्या लोकांसाठी तब्बल 300 क्विंटल खिचडी देखील वाटप केली जाणार आहे. वैद्यकीय टीमही या ठिकाणी सज्ज करण्यात आली आहे, असं मराठा समन्वयकांनी सांगितलंय.  (Latest Marathi News)

मुंबईतल्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर नोटीस दिली असेल: गिरीश महाजन

याबद्दल बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, ''यांच्याकडून बातमी आली की, ट्रॅक्टर सगळे भरून मुंबईकडे चला, म्हणून पोलिसांना थोडी काळजी घ्यावी लागेल. जरांगे पाटील यांचा मोर्चा असल्याने थोडी काळजी घ्यावी लागले. तसेच मुंबईतल्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर नोटीस दिली असेल.''

नोटीस आल्या म्हणून आम्ही थांबणार नाही: जरांगे पाटील

याच मुद्द्यावर बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, बीमधील सभा हा शांततेचा कार्यक्रम आहे. जरी कितीही नोटीस आल्या, तरी आम्ही आमच्या हक्कांसाठी लढणार. नोटीस आल्या म्हणून आम्ही थांबणार नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

PM Modi: बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात दिला रिमोट कंट्रोल; उद्धव ठाकरेंवर पीएम मोदींचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT