Dombivali ganpati festival  Saam tv
महाराष्ट्र

Dombivali : रेल्वे स्थानकाबाहेर वाहतूक कोंडी अन् फेरीवाल्यांच्या गराडा; तरुणाने मांडली गणपतीच्या देखाव्यातून व्यथा

Dombivali ganpati festival : डोंबिवली रेल्वे स्थानकाबाहेर वाहतूक कोंडी आणि फेरीवाल्यांचा गराडा पाहायला मिळतो. रेल्वे स्थानकाबाहेरची हीच परिस्थिती तरुणाने गणपतीच्या देखाव्यातून मांडली.

Vishal Gangurde

डोंबिवलीतील तरुण रुपेश राऊतने मांडली गणपतीच्या देखाव्यातून रेल्वे प्रवाशांची व्यथा.

स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांचा अडथळा आणि वाहतूक कोंडीचे वास्तव देखाव्यातून उघड

गणपतीच्या चरणी केली परिस्थिती सुधारण्यासाठी प्रार्थना

न्यायालयाच्या निर्णयानुसार स्टेशनपासून 150 मीटर अंतरावर फेरीवाल्यांना परवानगी द्यावी, अशी मागणी देखील त्याने केली.

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

रेल्वे वाहतूक ही मुंबई, ठाणे उपनगराची लाईफ लाईन म्हणून ओळखली जाते. मात्र मुंबई ठाणे उपनगरातील रेल्वे स्थानकातून नोकरदार वर्गाला कामावर जाण्यासाठी लोकल पकडण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. याच रेल्वे स्थानकाबाहेर फेरीवाल्यांचा गराडा आणि वाहतूक कोंडीतून मार्ग काढावा लागतो. रेल्वे प्रवाशांची व्यथा डोंबिवलीतील तरुणाने गणपतीच्या देखाव्यातून मांडली आहे.

रेल्वे स्थानकावर वेळेप्रसंगी घाई गडबडीत लोकल पकडण्यासाठी धावपळ करताना फेरीवाल्यांशी वादही निर्माण होतात. त्यामुळे प्रवाशांना होणाऱ्या त्रासाकडे लक्ष वेधण्याचा देखाव्यातून प्रयत्न डोंबिवलीतील तरुण रुपेश राऊत याने केला. कुठे तरी हा त्रास कमी होण्यासाठी या देखाव्याच्या माध्यमातून गणपती बाप्पा चरणी प्रार्थना केलीये.

रेल्वे स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त झाला पाहिजे न्यायालयाने ठरवून दिलेल्या रेल्वे स्टेशन परिसरापासून 150 मीटर अंतरावर फेरीवाल्यांना त्याचा व्यवसाय करण्यासाठी बसू दे. तसेच स्टेशन परिसरात रिक्षांना ठरवून दिल्या जागेवरून प्रवासी वाहतूक करण्यास मुभा द्यावी जेणे करून सामान्य माणसांना आपला प्रवास सुखकर करता येईल, असे त्यांनी सांगितले.

रुपेश राऊतने स्टेशनबाहेरील अनधिकृत फेरीवाले, वाहतूक कोंडीमुळे उडालेला फज्जा, ध्वनी प्रदुषणाचे मुद्दे देखाव्यातून मांडले. रुपेशने केलेल्या देखाव्याची चर्चा संपूर्ण डोंबिवलीमध्ये होत आहे. लोक मोठ्या आवडीने रुपेश राऊतच्या घरातील देखावा पाहायला येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Labh Drishti Yog 2025: 18 नोव्हेंबरपासून 'या' राशींना मिळणार नशीबाची साथ; बँक बॅलन्स डबल होऊन सर्व स्वप्नही होणार पूर्ण

Shocking: धक्कादायक! मित्रच बनला वैरी; २५ वर्षीय युवकाची दगडाने ठेचून हत्या, नेमकं घडलं काय?

EPFOचा पेन्शनधारकांसाठी मोठा निर्णय! सुरु केली नवी सर्व्हिस; काय फायदा होणार?

Maharashtra Live News Update: वैजापूर येथे शिवसेनेचा मेळावा, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार संदिपान भुमरे उपस्थित राहणार

Mumbai Monorail : ट्रायल रनमध्येच मोनोरेलमध्ये बिघाड, MMRDAच्या 'आधुनिक तंत्रज्ञाना'चा बोजवारा | पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT