अभिजित देशमुख, साम टिव्ही
Dombivali News: काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी टर्मिनसहून कर्जत लोकलने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाचा लोकलमध्ये मृत्यू झाला होता. डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात त्याचा मृतदेह उतरुन पालिका रुग्णालयात पाठविण्यात आला होता. मृतदेहाजवळ काहीच आढळून न आल्याने या मृतदेहाची ओळख पटविण्याचे आवाहन पोलीसांसमोर उभे ठाकले होते. रेल्वे पोलिसांनी या मयत प्रवाशाच्या शर्टावर असलेल्या टेलरच्या लेबलवरून मृताची ओळख पटवली. (Latest Marathi News)
त्यानंतर पोलिसांनी मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला. पोलिसांच्या या शोधकार्याचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. गेल्या आठवड्यात एक प्रवासी कर्जत लोकलने छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून कर्जतच्या दिशेने प्रवास करत होता. प्रवासात त्याला अस्वस्थ वाटून त्याचा मृत्यू झाला. प्रवाशांनी त्याला डोंबिवली रेल्वे स्थानकात उतरुन लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले. (Breaking Marathi News)
पोलिसांनी त्याचा मृतदेह कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठवला. मेलेल्या प्रवाशाकडे त्याच्या ओळखीची कोणतीही खूण नव्हती. त्यामुळे लोहमार्ग पोलिसांना मयताच्या नातेवाईकांना शोध घेताना अडचणी येत होत्या. मेलेल्या प्रवाशाच्या शर्टवर फॅशन टेलर, वांगणी (वेस्ट) अशी पट्टी होती.
हा प्रवासी वांगणी परिसरातील असावा असा अंदाज वरिष्ठ निरीक्षक अर्चना दुसाने यांनी वांगणीमध्ये फॅशन टेलर नावाचा टेलर आहे का याचा शोध पोलिसांना घेण्यास सांगितले. फॅशन टेलरचा शोध लागल्यानंतर त्याला मयत प्रवाशाचा फोटो पाठविण्या आला. हा प्रवासी वांगणीमध्ये लक्ष्मी सोसायटीत राहत असल्याचे पोलिसांना कळले. मयताचा शर्ट आपणच शिवून दिला असल्याचे टेलरने पोलिसांना सांगितले.
या व्यक्तिचे नाव मेहबूब नासिर शेख असे असल्याचे टेलरने सांगितले. टेलर आणि पोलिसांनी (Police) मयत महेबूब याचे घर गाठले. त्याच्या कुटुंबियांना कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात मयताची ओळख करण्यासाठी येण्यास सांगितले. महेबूब यांच्या पत्नीने पतीला ओळखले. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन मेहबूब यांचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला.
Edited by - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.