Nashik Accident News: पिकअप टेम्पोच्या धडकेत ८ वर्षीय चिमुकलीचा दुर्देवी अंत; दिंडोरीतील हृदयद्रावक घटना

Dindori Accident News: दिंडोरी रोडवरील अवधूतवाडीजवळ पिकअप टेम्पोने रस्त्यावरून जात असलेल्या ८ वर्षीय चिमुकलीला जोरदार धडक दिली.
Nashik Dindori Accident News
Nashik Dindori Accident NewsSaam TV

Nashik Dindori Accident News: नाशिकमधून एक दुर्देवी घटना समोर आली आहे. दिंडोरी रोडवरील अवधूतवाडीजवळ पिकअप टेम्पोने रस्त्यावरून जात असलेल्या ८ वर्षीय चिमुकलीला जोरदार धडक दिली. या धडकेत टेम्पोच्या चाकाखाली येऊन चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी टेम्पोची तोडफोड करत चालकाला मारहाण केली. (Latest Marathi News)

Nashik Dindori Accident News
Accident News: अमरावती-नागपूर महामार्गावर भीषण अपघात; कॉलेजला निघालेल्या तरुणीला ट्रकने स्कूटीसकट फरफटत नेलं

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतलं आहे. जोया सलीम शेख (वय ८ वर्ष ) अपघातात मृत्युमुखी पडलेल्या चिमुकलीचं नावं आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, जोया ही रस्त्यावरून जात होती.

यावेळी दिंडोरी रस्त्यावरील अवधूतवाडीजवळ भरधाव वेगात येणाऱ्या पिकअप टेम्पोने तिला जोरदार धडक दिली. या धडकेत जोया ही वाहनाच्या चाकाखाली आली. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर संतप्त जमावाने पिकअप टेम्पोची तोडफोड करील ड्रायव्हरला मारहाण केली. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. (Breaking Marathi News)

Nashik Dindori Accident News
Maharashtra Weather Report: राज्यात येत्या ४८ तासांत अवकाळीसह जोरदार गारपीटीची शक्यता; या विभागाला ऑरेंज अलर्ट

दरम्यान, जोयाला रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा रस्ता तिच्या वडिलांनी सलीम शेख यांनी अडवून धरला होता. अपघाताची (Accident) माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत गर्दी नियंत्रणात आणली. पंचवटी पोलिसांनी तातडीने चालकाला अटक करून जोयाचा मृतदेह तिच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिला. या घटनेनं परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com