Dombivli News Saam tv
महाराष्ट्र

Dombivli: अजगराची हत्या; वनविभागाकडून गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात

अजगराची हत्या; वनविभागाकडून गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात

प्रदीप भणगे

डोंबिवली : मलंगगड परिसरात उसाटणे गावातील (Dombivli) खोणी तळोजा महामार्गाच्या बाजूला आज सकाळी एक अजगर मारून टाकलेल्या अवस्थेत आढळून आला. याप्रकरणी वन विभागाकडून (Forest Department) गुन्‍हा दाखल करण्यात आला असून याचा तपास सुरू आहे. (Breaking News Marathi)

मलंगगड परिसरात असलेल्‍या उसाटणे गावात अजगर मृतावस्‍थेत आढळून आला. याच दरम्‍यान या अजगराला मारून इथे टाकल्यानंतरचे काही फोटो स्थानिक (Whatsapp) व्हॉट्सऍप ग्रुपवर व्हायरल झाले होते. या अजगराचे डोकं ठेचून त्याची हत्या करण्यात आली होती. याबाबतची माहिती मिळताच वन विभागाने घटनास्थळी येत पाहणी आणि पंचनामा केला.

दोषीवर होणार कारवाई

अजगराची हत्या करणाऱ्या अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितांची चौकशी वन विभागाकडून केली जातेय. यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती वन अधिकारी विवेक नातू यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मस्जिद बंदर स्थानकात तांत्रिक बिघाड; प्रवाशांचा रेल्वे ट्रॅकवरून प्रवास

Genelia Deshmukh Photos: साडी आणि मराठमोळे दागिने, देशमुखांच्या सुनेचा 'राजेशाही' थाट! Photo पाहतच राहाल

KDMC: शिक्षण साहित्याची सक्ती करणाऱ्या शाळांवर होणार कारवाई ; केडीएमसी शिक्षण विभाग अॅक्शन मोडवर

Bone cancer symptoms: ही लक्षणं दिसली तर समजा हाडांचा कॅन्सर शरीरात करतोय घर, वेळीच डॉक्टरांना दाखवा

सुनेत्रा पवारांची सभा सुरू असतानाच सुप्रिया सुळेंची एंट्री, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT