Dhule: दुचाकीवरून जाताना प्रसव कळा; महामार्गावरच महिलेची प्रसूती

दुचाकीवरून जाताना प्रसव कळा; महामार्गावरच महिलेची प्रसूती
Dhule News
Dhule NewsSaam Tv
Published On

धुळे : मुंबई- आग्रा महामार्गावरील डिसान चौफुलीपुढे एका महिलेला प्रसव कळा झाल्या. तिच्या पतीने महामार्गाच्या (Mumbai Agra Highway) कडेला दुचाकी थांबविली. त्यावेळी इतर पादचारी महिलांना ही स्थिती लक्षात आल्यावर त्यांनी पिशवीतून साड्या काढत पीडित महिलेभोवती गोलाकार कडे केले. यावेळी तिला कन्या रत्न प्राप्त झाले. (Letest Marathi News)

Dhule News
Osmanabad News: आमदार कैलास पाटील यांचं उपोषण तात्पुरतं स्थगित; फडणवीसांशी फोनवर झाली चर्चा

तिडीवाडी (ता. येवला, जि. नाशिक) येथील मुकेश गली पावरा हा पत्नी निकिता हिला दुचाकीने शनिवारी माहेरी सेंधवा (मध्य प्रदेश) येथे प्रसूतीसाठी नेत होता. मात्र, माहेरी पोहचण्यापुर्वीच (Dhule) धुळे परिसरातील डिसान चौफुलीपुढे निकिताला अचानक प्रसव कळा सुरू झाल्‍या. त्यामुळे मुकेशने महामार्गाच्या कडेला दुचाकी थांबविली. ही स्थिती पादचारी तीन महिलांना लक्षात आली. त्यांनी निकिता जवळ येत त्यांच्या पिशवीतील साड्या काढून निकिताभोवती गोल कडे केले.

गस्‍तीवरील पोलिसांचीही मदत

महामार्गावरून ये- जा करणारे नागरीक देखील वाहन थांबवून निकिताला रूग्णालयात पाठविण्याचा प्रयत्न होते. वाहनांना इशारा केला जात असतानाच गस्तीवर असलेले मोहाडी उपनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. आर. निकम, हवालदार पी. एन. सोनवणे, व्ही. बी. शिरसाट यांना ही घटना दिसली. क्षणाचाही विलंब न करता ते थांबले व त्यांनी लळींग टोलनाक्यावरील रुग्णवाहिका मागविली. त्याचवेळी निकिताला कन्या रत्न प्राप्त झाले. पोलिसांनी रुग्णवाहिकेतून निकितासह बाळ व मदतीसाठी त्या तीन महिलांना जिल्हा रूग्णालयात पाठविले. कर्तव्य बजावताना घटनेचे गांभीर्य ओळखून श्री. निकम, श्री. शिरसाट, श्री. सोनवणे यांनी माणुसकीचे दर्शन घडवून जनमानसात पोलिस दलाची प्रतिमा उंचाविण्याचा प्रयत्न केला.

त्‍या पोलिसांना दहा हजाराचे बक्षीस

त्यामुळे प्रभावित पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी गुणवत्तापूर्वक कामगिरीबाबत तिघा पोलिसांना दहा हजाराचे रोख बक्षिस देत कौतुक केले. त्यांच्यासह अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलिस अधीक्षक तथा शहराचे उपअधीक्षक ऋषीकेश रेड्डी यांनी तिघा पोलिसांचे अभिनंदन केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com