Dombivli Fire News  Saam tv
महाराष्ट्र

Dombivli Fire : आगीच्या ज्वाळा, धुराचे लोट आणि अधूनमधून येणारे स्फोटांचे आवाज; डोंबिवली MIDC आगीचे धडकी भरवणारे VIDEO

fire at dombivli midc factory : डोंबिवली एमआयडीसी फेज २ मधील इंडो अमायनी कारखान्यामध्ये मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटानंतर आगीचा भडका उडाला. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख, साम टीव्ही प्रतिनिधी

डोंबिवली : डोंबिवली पुन्हा एकदा कारखान्यात झालेल्या स्फोटाने हादरली आहे. एमआयडीसी कारखान्यात भीषण स्फोट होऊन आग लागली. कारखान्यात स्फोट झाल्यानंतर आगीचा भडका उडाला. कारखान्यात आग लागल्यानंतर आकाशात धुराचे लोट पसरले. आगीच्या घटनेने लोकांमध्ये एकच पळापळ झाली. आगीच्या घटनेनंतर परिसरात असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांनाही घरी सोडण्यात आलं. कारखान्यात वारंवार होणाऱ्या आगीच्या घटनेने लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

डोंबिवलीत पुन्हा एकदा कारखान्यात स्फोट झाल्यानंतर नागरिकांमध्ये पुन्हा एकदा दहशत निर्माण झाली आहे. या घटनेनंतर शहरातील सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. डोंबिवली एमआयडीसीतील फेज ३ मध्ये इंडो अमायनी कंपनीमध्ये मंगळवारी सकाळी दहा वाजता आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं आहे.

कारखान्यात होणाऱ्या मोठ्या स्फोटामुळे कंपनीतून काही कामगार दूर पळाले. तर परिसरात राहणाऱ्या स्थानिक नागरिकांमध्येही एकच तारांबळ उडाली. कंपनीच्या मागच्या बाजूस असलेल्या शेडनेही पेट घेतला आहे. तर या आगीत कंपनी जवळी दोन-तीन वाहनांनाही आग लागल्याची घटना घडली आहे. त्यामुळे आगीचा भडका आणखी वाढला आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुरु आहेत.

घटनास्थळी परिस्थिती काय?

अग्निशमन दलाचे अधिकाऱ्यांनी सांगितलं की, आगीच्या घटनेविषयी सविस्तर माहिती दिली. 'डोंबिवली एमआयडीसीत एका कंपनीला आग लागली. शिवाजी उद्योग असे कंपनीचं आहे. ही कंपनी अभिनव शाळेजवळ आहे. कंपनीला लागलेली आग नियंत्रणात आहे. या कंपनीत कोणताही कामगार अडकलेला नाही, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

'आग लागल्यानंतर घटनास्थळी ८ गाड्या पोहोचल्या आहेत. या आगीवर जवळपास नियंत्रण मिळवलं आहे. ही केमिकल कंपनी आहे, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

Anant Chaturdashi 2025 live updates : वर्धा जिल्ह्यात भक्तिभावात बाप्पांना निरोप

Maharashtra Live News Update: न्यायालयीन आणि रस्त्यावरील आंदोलनाची तयारी, ओबीसी नेत्याची बैठक संपली

हिंगोलीत अनंत चतुर्दशीचा जल्लोष; चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी लाखो महिला भाविकांची उपस्थिती|VIDEO

SCROLL FOR NEXT