Dombivli MIDC Fire : डोंबिवली MIDC मध्ये पुन्हा अग्नितांडव, अनेक जण अडकल्याची भीती

Fire At Dombivli MIDC Phase 2: डोंबिवलीत एमआयडीसीमध्ये पुन्हा एकदा भीषण अग्नीतांडव पाहायला मिळत आहे. या ठिकाणी कारखान्याला पुन्हा आग लागल्याची घटना घडली आहे.
डोंबिवलीमध्ये एमआयडीसीमध्ये पुन्हा अग्नितांडव
Fire At Dombivli MIDC Phase 2Saam Tv
Published On

अभिजीत देशमुख, साम टीव्ही डोंबिवली

डोंबिवलीमध्ये एमआयडीसीमध्ये कारखान्याला पुन्हा एकदा आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत स्फोटांचे मोठे आवाज येत असल्याची माहिती मिळत आहे. या आगीमुळे रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. डोंबिवली एमआयडीसीतील फेज 2 मधील Indo Amines या कंपनीमध्ये भीषण स्फोट झाले आहेत.

डोंबिवली एमआयडीसीतील फेज 2 मधील Indo Amines मध्ये अर्ध्या तासापूर्वी लाग लागली आहे. आगीचे कारण अस्पष्ट आहे. अग्निशमन विभाग घटनास्थळी दाखल झाला आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचं स्वरूप अतिशय भीषण आहे. कारखान्यात मोठमोठे स्फोट होत असल्याचे आवाज ऐकू येत आहेत. रहिवाशांची मोठी तारांबळ आगीमुळे उडालेली आहे.

या आगीचं स्वरूप अतिशय भीषण आहे. धुराचे काळेकुट्ट, मोठमोठे लोट उठताना दिसत आहेत. आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या पाच ते सहा अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी हजर झाल्या (Dombivli MIDC Phase 2) आहे. आग विझवण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरु आहेत. या स्फोटात अनेकजण अडकल्याचं सांगितलं जात आहे. आगीचे व्हिडिओ समोर आले आहेत. तर आजुबाजूला नागरिकांची मोठी गर्दी जमली (fire accident news) आहे.

डोंबिवलीमधील एमआयडीसीतील एका कंपनीला आग लागल्याची घटना घडली आहे. याच महिन्यात डोंबिवलीतील एमआयडीसीमध्ये एका कंपनीमध्ये स्फोट झाला होता. त्यात अनेकांना आपला जीव गमावावा लागला (Dombivli MIDC Fire News) होता. आता आणखी एका कंपनीमध्ये स्फोट झाल्याने परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. स्फोटाचे आवाज रहिवाशांना ऐकू आले आहेत.

डोंबिवलीमध्ये एमआयडीसीमध्ये पुन्हा अग्नितांडव
Mumbai Fire : आग लागताच कामगार पळत सुटले; ताडदेवच्या इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये भीषण आग, Video

यापूर्वीची घटना

डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान केमिकल कंपनीत मागील महिन्यात रिअॅक्टरमध्ये भीषण स्फोट झाला होता. यात १७ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला होता. तर ६० हून अधिक गंभीर जखमी झाले (Fire accident in MIDC Dombivli) होते. अमुदान कंपनीसह बाजूच्या दोन कंपन्यांमध्ये देखील मानवी अवशेष सापडले होते. या दुर्घटनेत अनेक कामगार बेपत्ता झाले होते. अमुदान ,कॉसमॉस, आणि सप्तवर्ध या कंपन्यांमध्ये काम करणारे काही कामगार बेपत्ता होते.

डोंबिवलीमध्ये एमआयडीसीमध्ये पुन्हा अग्नितांडव
Pimpri Chinchwad Fire News : काळेवाडीत 2 कारखान्यांना भीषण आग, गॅस सिलिंडरच्या स्फोटाने परिसर हादरला

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com