Dombivli Crime saam tv
महाराष्ट्र

Dombivli Crime : तिघांनी एकत्र दारू ढोसली, नंतर मित्राची हत्या केली; पुन्हा त्याच जागेवर पेग भरले

Dombivli News : दादूने पहाटे चार वाजता शेजाऱ्यांकडे लाकडी दांडके आहे का? अशी विचारना केली होती.

Chandrakant Jagtap

>> अभिजीत देशमुख, साम टीव्ही

Dombivli Murder : दारुवाल्याला चुगली केल्याचा वादातून दोन मित्रांनी एका मित्राची बांबूने मारहाण करत हत्या केल्याची घटना डोंबिवली सोनारपडा परिसरात घडली आहे. एवढंच नाही तर हत्या केल्यानंतर कुणाला संशय येवू नये म्हणून प्रेत दुसऱ्या माळ्यावरून खाली फेकले. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी काही तासातच दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

राजेश सहानी असं मृत व्यक्तीचं नाव आहे. मानपाडा पोलिसांनी या प्रकरणाचा वेगाने तपास करत अवघ्या काही तासात दादू मटू जाधव उर्फ पाटील आणि विनोद पडवळ या दोघांना ताब्यात घेतले आहे. धक्कादायक म्हणजे हत्या केल्यानंतर हे दोन्ही आरोपी पुन्हा दारू पिण्यासाठी दारूच्या अड्ड्यावर गेले होते. त्याच ठिकाणाहून पोलिसांनी त्यांना अटक केली.

सविस्तर माहिती अशी की, डोंबिवली पूर्व सोनारपाडा परिसरात साई श्रद्धा इमारतीच्या आवारात मृतदेह आढळून आल्याची माहिती सकाळच्या सुमारास मानपाडा पोलिसाना मिळाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि तपास सुरू केला. मृतदेहावर असलेल्या जखमा पाहून हत्या झाल्याचा संशय व्यक्त करत पोलिसानी तपास सुरू केला.

अवघ्या काही तासात या प्रकरणी दादू मटू जाधव उर्फ पाटील आणि विनोद पडवळ या दोघांना अटक केली. दादू मटू जाधव, विनोद पडवळ आणि मृत राजेश सहानी हे एकत्र राहतात. तिघांना देखील दारूचे व्यसन आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास या तिघांनी एकत्र दारू प्यायली. त्यानंतर तिघे दादूच्या घरी आले. घरी आल्यानंतर दादू आणि विनोदने राजेशला दारुवाल्याला चुगली का केली असा जाब विचारला. (Breaking News)

यावरून तिघांमध्ये वाद झाला. या वादातून संतापलेल्या दादू आणि विनोदने राजेशला शिवीगाळ करत बांबू आणि लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करत त्याची हत्या केली. कुणाला संशय येऊ नये म्हणून राजेशचा मृतदेह दुसऱ्या माळ्यावरील खिडकीतून खाली फेकून दिला. त्यानंतर दोघेही तेथून पसार झाले.

मानपाडा पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच तपास सुरू केला. आजूबाजूला चौकशी केली असता याच इमारतीमध्ये दादूची खोली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दादूने पहाटे चार वाजता शेजाऱ्यांकडे लाकडी दांडके आहे का? अशी विचारना केली होती. त्यावरून पोलिसांनी तात्काळ या दोन्ही आरोपींचा शोध घेतला आणि अवघ्या काही तासात या हत्येचा उलगडा झाला. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांचा विश्वासू साथीदार ‘रिओ’ अनंतात; शासकीय इतमामात भावपूर्ण अंतिम निरोप

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

SCROLL FOR NEXT