New Parliament Video: भव्य दिव्य अप्रतिम! संसदेच्या नवीन इमारतीची पहिली झलक समोर! पाहा व्हिडिओ

New Parliament Building Video: भारत सरकारने जारी केलेल्या या 1.48 सेकंदाच्या व्हिडिओत संसदेची इमारत आणि दोन्ही सभागृह दाखवण्यात आले आहेत.
New Parliament Building Video
New Parliament Building Videosaam tv

New Parliament House VIDEO : पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करणार आहेत. उद्घाटनाच्या दोन दिवस आधी सरकारने संसदेचा पहिला व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये नवीन संसदेची भव्यता आणि सौंदर्य दिसत आहे. भारत सरकारने जारी केलेल्या या 1.48 सेकंदाच्या व्हिडिओत संसदेची इमारत आणि दोन्ही सभागृह दाखवण्यात आले आहेत.

या व्हिडिओची सुरुवात संसदेच्या शिखरावर बसवण्यात आलेल्या अशोक स्तंभापासून होते. यानंतर सत्यमेव जयते अंकित भवन दाखवले आहे. व्हिडिओमध्ये संसदेनंतर इमारतीचे हवाई दृश्य दिसते. यासोबतच जुने संसद भवनही दिसते.

पीएम मोदींनी पाहणी केली

या वर्षी मार्चच्या अखेरीस पंतप्रधान मोदी नवीन संसद भवनाच्या अचानक पाहणीसाठी आले होते. पंतप्रधानांनी येथील अनेक कामांची पाहणी केली होती. तेथे उपस्थित कारागीर आणि मजुरांशीही त्यांनी संवाद साधला. पंतप्रधानांनी लोकसभा आणि राज्यसभा ही दोन्ही सभागृहे पाहिली. यावेळी त्यांनी एक तास येथे घालवला.

New Parliament Building Video
Samruddhi Highway: शिंदे-फडणवीस यांच्या हस्ते 'समृद्धी'च्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण; ६०० किलोमीटरचा मार्ग वाहतुकीसाठी खुला

पंतप्रधानांच्या हस्ते होणार मजुरांचा सन्मान

गृहमंत्री अमित शहा यांनी 24 मे रोजी पत्रकार परिषद घेऊन नवीन संसद भवन हा आपला इतिहास, सांस्कृतिक वारसा, परंपरा आणि सभ्यता यांना आधुनिकतेशी जोडण्याचा एक सुंदर प्रयत्न असल्याचे म्हटले. ही नवीन रचना पूर्ण करण्यात 60 हजार श्रमयोगींनी योगदान दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटन समारंभात त्यांचा सन्मान करणार आहेत. यानिमित्ताने एका ऐतिहासिक परंपरेचे पुनरुज्जीवन होत आहे. 28 मे रोजी 'आझादी का अमृत महोत्सवा'च्या निमित्ताने पंतप्रधान मोदी संसदेची नवीन इमारत राष्ट्राला समर्पित करणार आहेत.

संसद भवनात ठेवण्यात येणार सेंगोल

नव्या इमारतीत सेंगोल ठेवण्यात येणार असल्याचेही अमित शहा यांनी सांगितले. सेंगोल हा एक राजदंड असून तो ब्रिटिशांकडून सत्ता मिळवल्याचा प्रतीक आहे. जो सेंगोल प्राप्त करतो त्याने न्याय्य आणि निष्पक्षपणे राज्य करणे अपेक्षित आहे असे यावेळी शाह म्हणाले. देशाचे संसद भवन सेंगोलच्या स्थापनेसाठी अधिक योग्य ठिकाण आहे, संसदेपेक्षा अधिक योग्य, पवित्र आणि योग्य जागा असू शकत नाही. सेंगोल संग्रहालयात ठेवणे अयोग्य आहे. त्यामुळे जेव्हा पंतप्रधान मोदी संसद भवन देशाला समर्पित करतील तेव्हा त्यांना तामिळनाडूहून आलेला सेंगोल प्रदान केला जाईल असे शाह म्हणाले. (Breaking News)

New Parliament Building Video
Maharashtra Politics: भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेसने आखला मास्टर प्लॅन; शिंदेंच्या शिवसेनेलाही धक्का बसणार?

उद्घाटन कार्यक्रमाला विरोधकांनी विरोध केला

नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभासाठी राष्ट्रपतींना आमंत्रित न करण्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते इमारतीचे उद्घाटन करण्याऐवजी पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपतींचा अपमान केला असल्याचे नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे एकापाठोपाठ एक राजकीय पक्ष या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत आहेत. (Latest Political News)

या राजकीय पक्षांनी बहिष्कार टाकला

एमके, एआयएमआयएम, सीपीआय, सपा, व्हीकेसी, आरजेडी आणि जेडीयू यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे, तर आम आदमी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसही संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार नाही. (Latest Marathi News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com