Dombivali News Saam tv
महाराष्ट्र

Dombivali News: डोंबिवलीत संभाजी भिडेंची प्रतिमा जाळत निषेध

डोंबिवलीत संभाजी भिडेंची प्रतिमा जाळत निषेध

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख

कल्याण : संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा फुले यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्यांच्यावर चौफेर टीका सुरु आहे. या पार्श्वभूमीवर (Dombivali) डोंबिवलीत देखील रिपब्लिकन सेनेच्या वतीने संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांची प्रतिमा जाळत निषेध करण्यात आला. (Maharashtra News)

राज्यभरात संभाजी भिडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत अटक करण्याची मागणी करत आंदोलन सुरु आहेत. डोंबिवलीतील इंदिरा चौकात रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी संभाजी भिडे यांची प्रतिमा जाळत भिडे यांचा निषेध नोंदवला. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी; अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

देशद्रोही जाहीर करा 

यावेळी संभाजी भिडे विरोधात जोरदार घोषणाबाजी करत महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा गांधी, सावित्रीबाई फुले, छत्रपती संभाजी महाराज या महापुरुषांचा तसेच तिरंगी झेंड्याचा अपमान करणाऱ्या भिडे यांना देशद्रोही जाहीर करावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care : ठसका लागला की वरती बघायला का सांगतात ? कारण ऐकून तुम्ही सुद्धा चक्रवाल

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये मोबाईल दुरुस्तीच्या कारणावरून वाद, दुकान चालकाला टोळक्याकडून बेदम मारहाण

Maharashtra Rain Alert: पाऊस धुमाकूळ घालणार! पश्चिम महाराष्ट्र अन् मराठवाड्यात तुफान पावसाचा अंदाज, कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT