Dombivali News Saam tv
महाराष्ट्र

Dombivali : निळजे परिसरात दोन कोटींचे एमडी ड्रग्स जप्त; मानपाडा पोलिसांनी कारवाई, परदेशी ड्रस तस्कराला अटक

Dombivali News : डोंबिवलीच्या निळजे परिसरातील हायप्रोफाईल सोसायटीमध्ये कारवाई करण्यात आली आहे. सोसायटीच्या परिसरात एक परदेशी तस्कर एमडी ड्रग्स घेऊन येणार असल्याची माहिती मानपाडा पोलिसांना मिळाली होती

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
डोंबिवली
: डोंबिवली जवळील कोणी निळजे परिसरातील हायप्रोफाईल वस्ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या परिसरात मानपाडा पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे दोन कोटी रुपयांचे एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. तर एमडी ड्रग विक्रीसाठी आलेल्या परदेशी ड्रग्स तस्कराला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  

डोंबिवलीच्या निळजे परिसरातील हायप्रोफाईल सोसायटीमध्ये सदरची कारवाई करण्यात आली आहे. या सोसायटीच्या परिसरात एक परदेशी तस्कर एमडी ड्रग्स घेऊन येणार असल्याची माहिती मानपाडा पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचला. याच गावातील तलावाजवळ एका रोडवर एक परदेशी इसम संशयास्पद रित्या फिरताना पोलिसांना आढळला. परदेशी नागरिकाला बेड्या ठोकल्या. इसा बकायोका असे या परदेशी नागरिकाचे नाव असून तो मूळचा दक्षिण आफ्रिकेतील असल्याची माहिती समोर आली आहे. 

आठवडाभरापूर्वीच २ कोटींचे ड्रग्स जप्त   

या कारवाईदरम्यान पोलिसांनी त्याच्या जवळून सुमारे २ कोटी १२ लाख रुपये किमतीचे दीड किलो एमडी ड्रग्स मानपाडा पोलिसांनी जप्त केले आहेत. आठवडाभर पूर्वीच मानपाडा पोलिसांनी खोणी पलावा येथील एका हायप्रोफाईल सोसायटीत छापा टाकत सुमारे दोन कोटींचे जप्त केले होते. या प्रकरणी चौघा जणांना अटक देखील करण्यात आली होती. त्या पाठोपाठ पुन्हा निळजे येथील हाय प्रोफाईल परिसरात परदेशी ड्रग्स तस्कराला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. 

ड्रग्स तस्करीची मोठी साखळी 

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ईसा बकायोका हा मूळचा दक्षिण आफ्रिका येथील राहणारा असल्याची माहिती समोर आली आहे. तो सध्या डोंबिवली निळजे गाव परिसरात राहत होता. तर इसा याने हे ड्रग्स कुठून आणले?, तो ड्रग्स कोणाला विकणार होता? याचा तपास मानपाडा पोलीस करत आहेत. दरम्यान आठवडाभरात दुसरी डोंबिवली मधील ड्रग्स तस्करीचे इंटरनॅशनल कनेक्शन पुन्हा एकदा समोर आलं आहे. या ड्रग्स तस्करीच्या धंद्यात इंटरनॅशनल कनेक्शन असून आणखी काही साथीदार असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून पोलीस या साथीदारांचा शोध घेत आहेत .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याण पूर्वेत चिंचपाडा १०० फूट रोडवर उभ्या कारला आग

Osteoporotic spine fracture: ऑस्टियोपोरोटिक स्पाइन फ्रॅक्चरचं निदान कसं केलं जातं? तज्ज्ञांनी सांगितलं कोणती काळजी घ्याल

Walking Fitness Routine: खरचं १०,००० पाऊलं चालण्याने शरीरात हे चमत्कारीक बदल होतात का?

Guru Gochar 2026: 12 वर्षांनंतर गुरु करणार सूर्याच्या राशीत प्रवेश; या राशींना मिळणार चांगली नोकरी आणि पैसा

Green Chutney Recipe : 'सँडविच'ची चव वाढवणारी 'हिरवी चटणी' घरी कशी बनवाल? वाचा परफेक्ट रेसिपी

SCROLL FOR NEXT