Dombivali News Saam tv
महाराष्ट्र

Dombivali News : रिंग रोडमध्ये बाधित शेतकऱ्यांना चार पट मोबदला द्या; युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख

डोंबिवली : डोंबिवलीत रिंग रूट सारख्या विविध प्रकल्पातल्या भूमीपुत्रांच्या जमिनी बाधित होता आहेत. (Dombivali) त्यांना चार पट टीडीआर स्वरूपात मोबदला देण्यात यावा; अशी मागणी माजी स्थायी समिती सभापती व शिवसेना युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी (Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे केली आहे. तसेच ज्यांच्या जमिनी या आधी हस्तांतरित करण्यात आल्या, त्यांना देखील या मोबदल्याचा लाभ देण्याची मागणी देखील केली. (Tajya Batmya)

दुर्गाडी ते मोठा गाव रिंग रूट हा महापालिका क्षेत्रातील महत्वाचा प्रकल्प आहे. त्यामुळे शहरातील वाहतुक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. हा रिंगरोड डोंबिवलीसाठी महत्त्वाचा रस्ता आहे. डोंबिवली शहराचा कायापालट करणारा हा रिंगरोड असून रिंगरोडमधील ७० टक्के जमीन हस्तांतरित झाली आहे. उर्वरीत ३० टक्के हस्तांतरित करण्याचे काम महापालिकेकडून सुरू आहे. मात्र रिंगरोडमध्ये बाधित शेतकऱ्यांनी वाढीव मोबदल्याची मागणी केली आहे. याबाबत माजी स्थायी समिती सभापती व शिवसेना युवा सेना सचिव दिपेश म्हात्रे यानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जागेच्या बदल्यात दोन पट टीडीआर ऐवजी चार पट टीडीआर देण्यात यावा; अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत एमएमआरडीए कार्यालयात झालेल्या बैठकीत जमीन अधिग्रहण बाबत चर्चा झाली. या बैठकीत प्रचलित नियमानुसार दिले जाणारे दोन पट टीडीआर तुटपुंजा दिसत असून चार पट टीडीआर दिला जावा. तसेच ज्यांच्या जमिनी आधी हस्तांतरित झाल्या. त्यांना देखील या मोबदल्याचा लाभ घ्यावा. जेणेकरून जमीन अधिग्रहण प्रक्रिया सोपी होईल. याबाबत खासदार श्रीकांत शिंदे व अधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून तसेच मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून सदर विषयात लवकरात लवकर मार्ग काढला जाईल असे कळवण्यात आल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar News : नंदुरबार दंगल..दगडफेक करणाऱ्या ४० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात; शहरात तणावपूर्ण शांतता

Manoj Jarange Patil: उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती खालावली; मनोज जरांगेंचा उपचार घेण्यास नकार

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Bigg Boss Marathi : कालपर्यंत कडू होतं? निक्कीचा अरबाजला सवाल, बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय?

निवडणुकीआधीच महायुतीला मोठा धक्का, मित्रपक्षाने साथ सोडली, माजी मंत्र्याची भरसभेत घोषणा!

SCROLL FOR NEXT